• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raja Shivaji Movie 5 Records : ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने रचला इतिहास, अवघ्या 25 दिवसांत 5 मोठे रेकॉर्ड्स

May 26, 2026 by admin Leave a Comment


हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत रिलीज झालेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. 1 मे रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटात रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिषे भच्चन, भाग्यश्री, विद्या बालन आणि सलमान खान यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. रितेश देशमुख याने यात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून याच चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं शिवधनुष्यही त्यानेच पेललं आहे. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने शानदार कामगिरी केली असून बॉक्स ऑफीसवर मोठी कमाई करत कोट्यवधींचा गल्ला जमवला.

आपल्या प्रभावी कमाईसोबतच, या चित्रपटाने अनेक मैलाचे दगडही गाठले आहेत. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने स्थापित केलेल्या पाच प्रमुख रेकॉर्ड्सबद्दल जाणून घेऊया.

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी, अर्थात महाराष्ट्र दिनी, मराठी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. रितेश देशमुख व्यतिरिक्त, या चित्रपटात जेनेलिया डिसूझा, अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि विद्या बालन यांच्यासह इतर कलाकारांनीही काम केलं तर सललामन खानचाही या चित्रपटात छोटासा कॅमिओ आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलं असून चौथ्या आठवड्यातही दमदार कमाई सुरू ठेवली आहे.

चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर निर्मात्यांच्या सांगण्यानुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या 24 दिवसांत भारतात 101.4 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजेच भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा पहिला मराठी चित्रपट ठरून या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा अध्याय लिहिला आहे.

‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बनवले 5 रेकॉर्ड्स

– मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात 100 कोटी रुपये कमावणारा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट भारतातील पहिला सिनेमा ठरला आहे.

– ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटाचा 90 कोटी रुपयांचं कलेक्शन मागे टाकलं असून, मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

– जगभरात ११४ कोटी रुपयांहून अधिक कमाई करून ‘राजा शिवाजी’ चित्रपट हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

– हा ऐतिहासिक चित्रपट रितेश देशमुखच्या यशस्वी कारकिर्दीतील अधिकृतपणे 100 कोटींची कमाई करणारा 10 वा चित्रपट ठरला आहे. यापूर्वीचे १०० कोटींची कमाई करणारे त्याचे 9 चित्रपट हे व्यावसायिक, मल्टी-स्टारर बॉलीवूड चित्रपट होते. स्वतः दिग्दर्शित केलेल्या एका प्रादेशिक चित्रपटाद्वारे हा टप्पा गाठणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे.

– ‘राजा शिवाजी’चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 11.7 कोटी रुपयांची कमाई करत, मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट होण्याचा मान मिळवला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?
  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in