• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले…

September 10, 2026 by admin Leave a Comment


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला हलवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा दिल्लीतून हलवून गुजरातच्या केवडिया येथे होणार आहे. दिल्लीचे महत्त्व संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.

राज ठाकरे यांनी म्हटले की, देशाच्या आर्थिक राजधानीचे म्हणजेच मुंबई शहराचे महत्त्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असतानाच, दुसरीकडे देशाच्या राजधानीचे महत्त्व हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुरस्कार सोहळ्याचे स्थळ हलवायचेच होते, तर ते मुंबईत का आणले नाही, असा थेट सवाल त्यांनी विचारला. ज्या दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला, त्या महाराष्ट्रात हा पुरस्कार सोहळा का नाही, असेही त्यांनी नमूद केले.

स्वतःला काही निर्माण करता आले नाही की नाव बदल, स्थळ बदल अशाप्रकारे भ्रामक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले. केंद्रातील दोन सत्ताधीशांचा “उरलो तर गुजरातपुरते” हा अट्टहास दिसतोय, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. यामुळे महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमींमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. हा निर्णय केवळ राजकीय हेतूने घेतल्याचे मत अनेकजण व्यक्त करत आहेत.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारत आणि रशियाच्या मैत्रीचा नवा अध्याय, जग बघतच राहिले, थेट बैठकीपूर्वीच..
  • लहान मुलांच्या नाक-कानात एखादा चुकून पदार्थ अडकला, पालकांनी काय करावे अन् काय करून नये?
  • जरांगे पाटलांच्या आंदोलनाला किती यश? आतापर्यंत किती मागण्या मान्य? कलेक्टर मॅडमने यादीच दिली
  • बोले तो अस्लम भाय लुढ़क गया… आयफोन लॉन्च होताच सोशल मीडियावर फिल्मी मिम्सचा बेक्कार पाऊस; किमतीने उडवली झोप
  • रोहित शर्माच्या टी-शर्टवरील मेसेजने वादाला फोडणी! अजित आगरकर आणि बीसीसीआयवर निशाणा साधला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in