
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. दरम्यान येत्या बारा सप्टेंब रोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक घेणार आणि मुंबईला जाण्याच्या तारखेची घोषणा करणार, मी मुंबईला शंभर टक्के जाणार असा इशारच आता मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता सरकार दरबारी हालचालींना वेग आला असून, जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांची या पार्श्वभूमीवर महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आहे. आतापर्यंत सरकारने या संदर्भात कोण कोणते निर्णय घेतले आहेत? त्याबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली.
नेमकं काय म्हणाल्या जिल्हाधिकारी?
‘मराठा आरक्षण संदर्भात गेल्या 3 वर्षातील काम जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. शिंदे समिती मार्फत नोंदीची तपासणी करण्यात आली आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यात एकूण 5027 नोंदी आढळून आल्या आहेत, त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 18200 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 99.99 टक्के मंजूर, झाले आहेत, याचा आनंद आहे. फक्त 0.1 टक्के एवढेच अर्ज नाकारण्यात आले आहेत. त्यातही ज्यांच्याकडे कमी कागदपत्रे होती त्यांचेच अर्ज नाकारण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी मित्तर यांनी दिली आहे.
2 सप्टेंबर 2025 ला जो हैदराबाद गॅझेटचा जीआर आला होता. त्याअनुषंगाने प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळेच जालन्यात शिबीर सुरू करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या निर्देशानुसार प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये यादी लावावी अशा सूचना होत्या, ती यादी लावण्यात आली आहे. त्याचे फोटोही आमच्याकडे आहेत. जे कुणबी किंवा मराठा कुणबी आहेत. त्यांनी अर्ज केले नसेल तर त्यांनी अर्ज करावे. ही चांगली संधी आहे. जालन्यातील 22 मंडळात शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यात SEBC 10 टक्के आरक्षानुसार 35 हजार 981 प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत, अशी माहिती देखील यावेळी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी दिली आहे.
Leave a Reply