• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मंत्री अतुल सावे यांच्या कुटुंबाला मारहाण, छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने खळबळ

September 10, 2026 by admin Leave a Comment


मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधु आणि पुतण्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेय अजित सावे (वय 35 वर्षे) आणि अजित मोरेश्वर सावे (70 वर्षे) हे दोघं मारहाणीत जखमी झाले आहेत. शेती आणि रस्त्याच्या वादातून मारहाण झाल्याचं बोललं जात आहे. असं असताना मंत्री अतुल सावे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. मंत्री अतुल सावे घटनेबाबत माहिती देताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, पैठण तालुक्यातील नायगाव खांदेवाडी येथे माझ्या पुतण्याचा गेल्या दोन वर्षांपासून काँक्रीट प्लांट आहे. तिथे सर्व काम नियमाने आणि व्यवस्थित सुरू होते. मात्र, अचानक काही स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गाडी आणून तिथला रस्ता अडवला आणि ‘इथून गाडी घेऊन जाऊ नका’ अशी दमदाटी सुरू केली. माझ्या भावाने मध्यस्थी करत, ‘रस्त्याचा काही विषय असेल तर आपण शांततेत बोलू, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊ आणि हवं असल्यास अधिकृत मोजणी करू’ असे सांगितले. परंतु, त्या लोकांनी काहीही न ऐकता थेट मारहाण केली.

अतुल सावे यांनी पुढे सांगितले की, भावाला धक्काबुक्की होत असल्याचे पाहून जेव्हा माझा पुतण्या त्यांना समजवायला गेला, तेव्हा त्या गुंडांनी त्याच्यावर थेट जीवघेणा हल्ला चढवला. त्यांनी बुलेट गाडीच्या लोखंडी रॉडने आणि हातातील कड्याने पुतण्याच्या डोक्यावर प्रहार केले. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सुरुवातीला त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेऊन टाके घालण्यात आले, मात्र दुखापत गंभीर असल्याने आता त्याला छत्रपती संभाजीनगरमधील सिग्मा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

अतुल सावे यांनी पुढे सांगितलं की, हे स्थानिक गुंड असून त्यांना या भागात दादागिरी करण्याची सवय जडली आहे. खंडणीसाठी हे लोक काहीही करायला तयार होतात. आज त्यांनी दादागिरीच्या उद्देशानेच हे कृत्य केले, पण रॉडने मारल्यामुळे प्रकरण एवढे गंभीर होईल याचा अंदाज त्यांना आला नसावा. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी केवळ मारहाणच केली नाही, तर माझ्या भावाच्या खिशातील पैसेही काढून घेतले आणि माझ्या वाहनचालकाला जातिवाचक शिवीगाळ देखील केली.

मंत्री अतुल सावे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी थेट पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि आयजी यांच्याशी संपर्क साधून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. संबंधित गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तातडीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी सावे यांनी केली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Google Gemini आणि ChatGPT मध्ये भन्नाट 80 च्या दशकातील फोटो कसे तयार करायचे? फक्त हे पेस्ट करा लगेच होईल काम..
  • MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
  • भारताची नवी औद्योगिक क्रांती! ‘जेफरीज’चा अहवाल; स्पेस, सेमीकंडक्टरसह 6 क्षेत्रांमध्ये होणार अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? मग शुक्रवारी करा हे खास उपाय, लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने होईल धनाचा वर्षाव
  • ट्रक आणि टाटा मॅजिकची नांदेड येथे भीषण धडक, सहा जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in