
Rohit Sharma Viral T-Shirt: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा त्याची स्टाईल, त्याचं वागणं यामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. मैदानावरील त्याचा बिनधास्त अंदाज त्याचा चाहत्यांना कायमच भावला आहे. रोहित शर्माचं एक वाक्यच भारी पडतं. त्यावरून मीम्स आणि बराच तयार होतो. दुसरीकडे, रोहित शर्माने मैदान गाजवलं आहे. पण गेल्या काही वर्षात त्याची बॅट हवी तशी तळपली नाही. पण लॉर्ड्सवर त्याने शतक ठोकलं आणि टीकाकारांची तोंड बंद केली. असं असताना 39 वर्षीय रोहित शर्माचा नवा लुक वेगाने व्हायरल होत आहे. त्याचा टीशर्टवरील एक मेसेज चर्चेत आहे. रोहित शर्माने टीशर्टवरील मेसेजवरून बीसीसीआय आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यावर टीकास्त्र सोडल्याचं बोललं जात आहे.
रोहित शर्माच्या टी-शर्टवरी दोन शब्दांनी लक्ष वेधून घेतलं
रोहित शर्मा भारतीय टेलिव्हिजनवर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. फॅमिली फुल हाउस विद रोहित शर्मा नावाने हा कार्यक्रम येत आहे. हा कार्यक्रम होस्ट करणार असून 19 सप्टेंबरपासून ऑन एअर जाणार आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो शूट करण्यात आला आहे. यात रोहित शर्मा कॅमेऱ्यावर बोलत आहे की, ‘अरे यार किती वेळा रिहर्सल करायला लावणार? पण येत आहे 19 सप्टेंबरला..’ पण चाहत्यांचं लक्ष त्याच्या डायलॉग ऐवजी पांढऱ्या टीशर्टवरील मेसेजवर गेलं. रोहित शर्माच्या टी-शर्टवर एक छोटासा मेसेज लिहिला होता. त्यावर ‘नॉन कमिटल’ असं लिहिलं होतं.
Rohit Sharma is trolling Ajit Agarkar over that “non-committal” remark
pic.twitter.com/75PQVYmyqx
— R A T N I S H (@LoyalSachinFan) September 10, 2026
सोशल मीडियावर रोहित शर्माच्या चाहत्यांनी त्याचा हा मेसेज अजित आगरकरच्या जुन्या वक्तव्याशी जोडला आहे. मागच्या वर्षी झालेल्या पत्रकार परिषदेशी त्याचा संबंध जोडला गेला. यात शुबमन गिलची भारताच्या नवा वनडे कर्णधारपदी नियुक्ती केली होती. सप्टेंबर 2025 मध्ये इंडियाचा पुढचा प्लान सांगत चीफ सिलेक्टर अजित आगरकरने सांगितलं होतं की, रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघंही ‘नॉन कमिटल’ आहेत. म्हणजेच दोन्ही खेळाडू वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणं निश्चित नाही. त्यामुळे वादाला फोडणी मिळाली होती. आता टीशर्टवरील मेसेज त्या वक्तव्याशी जोडला जात आहे.
Leave a Reply