• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rain Update : कुठे रेड तर कुठे यलो अलर्ट, राज्यात नेमका कुठे होणार तुफान पाऊस; IMD चा नवा अंदाज आला!

July 9, 2026 by admin Leave a Comment


राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, उपनगर, नाशिक या भागात मोठा पाऊस झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबई आणि उपनगरात नागरिकांना मोठ्या अडचणी आल्या. नाशिकला तर ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता. परंतु सुदैवाने नाशिकवरील हे संकट टळले. दरम्यान, आता 12 जुलैपर्यंतचा नवा हवामान अंदाज समोर आला आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाचा नवा अंदाज काय?

मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार 8 जुलै रोजी नुंदरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, पुणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक या शहरांना यलो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

येत्या 9 जुलै रोजी नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल, सातारा घाट, पुणे घाट भागाला ऑरेंज अलर्ट असेल. 10 आणि 11 जुलै रोजी नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. तर 12 जुलै रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.

महाराष्ट्रात काही ठिकाणी जीवितहानी

दरम्यान, सध्या मुंबई आणि उपगरात पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. वसई-विरार भागात सर्वाधिक पाऊस झालेला आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दुसरीकडे काही ठिकाणी पावसामुळे काही दुर्घटना घडल्या आहेत. पाण्यात बुडून, पाण्यात वाहून गेल्याने राज्यात काही मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी सध्या समोर आलेला हवामान अंदाज लक्षात घेऊनच नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in