• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल

July 24, 2026 by admin Leave a Comment


NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी वापरलेल्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर का करण्यात आला, असा थेट सवाल केंद्र सरकारला केला.

सोमवारी CJP (कॉक्रोच जनता पार्टी)च्या नेतृत्वाखाली NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ संसदेकडे मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केल्याची माहिती समोर आली होती. या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या सोबत आंदोलनात सहभागी झालेला एक विद्यार्थीही उपस्थित होता. या विद्यार्थ्यावर पॅलेट गनचा मारा झाल्याचा दावा करण्यात आला. यावरून राहुल गांधी यांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागत, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची कारवाई का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला.

यावेळी राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही निशाणा साधला. NEET पेपरफुटी प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.

राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईवर टीका करत, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करणे योग्य नसल्याचे म्हटले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकार दडपशाही करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या सर्व घडामोडींमुळे NEET पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापले असून, विरोधकांकडून केंद्र सरकारवर सातत्याने दबाव वाढवला जात आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोनल दिनुशाची भारताविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी, कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
  • Madhuri Dixit : प्रश्नांची सरबत्ती, स्वप्नांची कहाणी अन् मोहक अदा; ‘कोण होणार करोडपती’साठी माधुरीने का दिला होकार ?
  • तिबेटमध्ये ईशा फाउंडेशनचे ८० भक्त बेपत्ता… सद्गुरूंनी चीनकडे मोठी मागणी, व्हिडिओमध्ये भावूक झाले
  • Plane Crash : बारामतीनंतर आणखी एका ठिकाणी विमान कोसळलं; क्षणार्धात झाले अनेक तुकडे, दोघांचा मृत्यू
  • Nitesh Karale : राष्ट्रवादीचे नितेश कराळे मास्तर पोलिसांच्या ताब्यात; सोशल मीडियावरील एक चूक पडली महागात, राजकीय वर्तुळात खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in