• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raghav Chadha Video: आता माझा रोल बदलला आहे मी यावर बोलणार नाही तर…भाजपामध्ये प्रवेश घेताच राघव चड्डा यांचे सूर बदलले

July 31, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी प्रकरणावरुन अनेक गदारोळ झाला होता. CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्त्वाखाली विद्यार्थ्यांनी दिल्ली जंतर मंतरवर आंदोलन केले होते. या आंदोलनाची एकच मागणी होती ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा. अखेर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आणि धमेंद्र प्रधान यांनी यांच्या पदाचा राजीनामा दिला. आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले आहे.  या प्रकरणावर अनेकांनी आप आपले मत मांडलेले पाहायला मिळाले. पण राज्यसभा सदस्य राघव चड्डा यांनी यावर एकही विधान केलेले नाही. आता संसदेत पेपरफुटी प्रकरणावर चर्चा होताना दिसत आहे.  यादरम्यान राघव चड्डांनी आपले मत मांडले आहे.  राज्यसभेत पेपरफुटी विरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान भाजप खासदार राघव चड्ढा अखेर बोलले.

राज्यसभा खासदार राघव चड्डा म्हणाले की, “नीट पेपरफुटीवर मी गप्प का होतो, असा प्रश्न अनेकांनी मला विचारला. तुम्ही नीट पेपरफुटी प्रकरणावर कधी बोलणार?”  तर माझे म्हणणे इतकेच आहे की, “पूर्वी, जेव्हा मी विरोधी पक्षात होतो, तेव्हा प्रश्न विचारणे हे माझे काम होते आणि मी ते प्रामाणिकपणे केले. आता मी सत्ताधारी पक्षात असल्याने माझी भूमिका बदलली आहे. आता माझी जबाबदारी प्रश्न विचारण्याची नाही, तर लोकांना समाधान मिळावे अशी उपाययोजना करणे आहे, म्हणूनच आम्ही ठरवले होते की, जेव्हा आम्हाला या समस्येवर तोडगा सापडेल, त्याच दिवशी मी बोलेन आणि अखेर आज तोच दिवस आहे. आज आमच्या सरकारने या समस्येवर उपाय शोधून काढला आहे. मीही कॅमेऱ्यासमोर बोलू शकलो असतो, पण मी ते केले नाही.”

VIDEO | Delhi: “Paper leaks cannot be addressed through media soundbites but require an institutional solution, which govt is bringing through the Bill,” says BJP MP Raghav Chadha in Rajya Sabha during debate on anti-paper leak Bill.

(Source: Sansad TV) pic.twitter.com/jackRKi73M

— Press Trust of India (@PTI_News) July 30, 2026

राघव म्हणाले की, “पेपरफुटीसारख्या गंभीर आजारावर कायमस्वरूपी इलाजाची गरज आहे.  ज्याप्रमाणे कर्करोगावर क्रोसिन देऊन उपचार करता येत नाही, त्याचप्रमाणे पेपरफुटीसारख्या समस्येवर माध्यमांतील छोट्या-छोट्या बातम्यांनी नव्हे, तर एका संस्थात्मक उपायानेच तोडगा निघेल, जो आमचे सरकार आज या विधेयकाद्वारे उपलब्ध करून देणार आहे. मला नीटच्या विद्यार्थ्यांना सांगायचे आहे की, तुमचा राग रास्त आहे. तुमची वेदना खरी आहे. परीक्षा पद्धतीबद्दलच्या तुमच्या तक्रारीही खऱ्या आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या चिंता व्यक्त केल्या आणि तुमच्या वेदना सांगितल्या, तेव्हा पंतप्रधानांनी एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. विद्यार्थ्यांनी मागण्या केल्या आणि सरकारने कारवाई केली. ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आणि व्यवस्था बदलली. जेव्हा एखादा विद्यार्थी नीटसारख्या परीक्षेची तयारी करतो, तेव्हा तो एकटा तयारी करत नाही; त्याचे संपूर्ण कुटुंब तयारी करते. आई घरखर्च कमी करते. वडील शिकवणी आणि घराच्या भाड्यावर कुटुंबाची बचत खर्च करतात. कुटुंबाला कर्जही काढावे लागते.”





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!
  • Manoj Jarange Patil : तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या, आम्ही म्हणतो प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासमोर अट
  • माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in