
आज संकष्ट चतुर्थीनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गणरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविक मंदिर परिसरात दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढल्याने व्यवस्थापनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाने टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी “साकड घातलं काय देवाला साकड घातलं, काही नाही देवाचा आशीर्वाद असू दे बस एवढंच” असे म्हटले. संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरात भाविकांकडून भक्तिभावाने पूजा आणि दर्शन घेतले जात आहे. बाप्पाचे दर्शन घेऊन भाविक समाधान व्यक्त करत आहेत.
Leave a Reply