• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Premium Beer : 60 वर्षांपूर्वीची प्रिमियम बिअर भारतातही मिळणार, किंमत फक्त 230 रुपये, चव आणि नाव एकदम खास!

August 3, 2026 by admin Leave a Comment


60 वर्षांनंतर ब्रिटनची प्रसिद्ध ‘लायन’ बिअर भारतात; दिल्लीतून पुनरागमन, किंमत 230 रुपये

भारतात मद्यसौकीनांची कमतरता नाही. मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक आहे, हे माहीत असूनही रोज लाखो लिटर दारू पोटात रिचवली जाते. आजकाल तर मद्याप्रेमींचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते दिवसेंदिवस वाढतच आहे. काही मद्यप्रेमी तर फार शौकीन असतात. त्यांना वेगवेगळ्या ब्रँड्सचे मद्य प्यावे वाटते. अशाच बिअर शौकिनांसाठी एक चांगली बातमी आहे. तब्बल 60 वर्षांनंतर ब्रिटनची प्रसिद्ध बिअर आता भारतातही मिळणार आहे.

1836 मध्ये लंडन येथे स्थापन झाली कंपनी

ब्रिटनमधील तब्बल 190 वर्षांची परंपरा असलेल्या लायन ब्रुअरीने सुमारे 60 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत पुनरागमन केले आहे. कंपनीने सध्या दिल्लीतून आपल्या विक्रीला सुरुवात केली असून, लवकरच हरियाणा, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्येही विस्तार करण्याची तयारी सुरू केली आहे. 1836 मध्ये लंडन येथे स्थापन झालेल्या लायन ब्रुअरी या कंपनीचा भारताशी ऐतिहासिक संबंध राहिला आहे. या कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करताना कॉपरड्रॉप स्पिरिट्स या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. ही कंपनी भारतातील अधिकृत आयातदार आणि वितरक म्हणून काम पाहणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कंपनीने आइसलँड लागर आणि पेल एले या दोन प्रीमियम बिअर बाजारात आणल्या आहेत. या दोन्ही बिअरच्या 330 मिलीच्या बाटलीची किरकोळ किंमत 230 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

बिअर बाजार दरवर्षी 40 टक्क्यांनी वाढतोय

भारतात प्रीमियम आणि क्राफ्ट बिअरची मागणी झपाट्याने वाढत असल्याचे कंपनीचे मत आहे. बदलती जीवनशैली आणि नव्या चवींचा शोध घेणारे ग्राहक यामुळे या क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. कंपनीच्या अंदाजानुसार, भारतातील प्रीमियम बिअर बाजार दरवर्षी 40 टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत आहे, तर 2028 पर्यंत एकूण बिअर बाजारात 8 ते 10 टक्के वार्षिक वाढ होण्याची शक्यता आहे.

लायन ब्रुअरीचे व्यवस्थापकीय संचालक विल ज्युलियस यांनी भारतातील पुनरागमन हा कंपनीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर देशातील इतर मोठ्या शहरांमध्येही या ब्रँडचा विस्तार करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
  • आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना…
  • मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in