• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Post Officeची धमाकेदार योजना, दररोज 300 रुपये गुंतवा; मुदतीनंतर 1500000 रुपये मिळतील, जाणून घ्या कॅल्क्युलेशन

July 28, 2026 by admin Leave a Comment


पोस्ट ऑफिसकडून सर्वसामान्यांसाठी हटके योजना बाजारात आणत असते. दररोजच्या लहान बचतीमधूनही मुदत पूर्ण झाल्यानंतर चांगली रक्कम होऊ शकते. मध्यमवर्गीयांसाठी अशीच एक धमाकेदार योजना चर्चेत आली आहे. या योजनेत तुम्ही दररोज 300 रुपयांची गुंतवणूक केल्यास मुदत पूर्ण झाल्यानंतर 15 लाख जमा होतील. या योजनेविषयी अधिकची माहिती जाणून घ्या.

पोस्ट ऑफिसची आरडी योजना भरपूर प्रसिद्ध आहे. या योजनेत एकरकमी ठेव जमा करण्याची आवश्यकता नसते. तुम्ही एसआयपीसारख्या सरकारी योजनेत थोडी-थोडी रक्कम गुंतवू शकता. या योजनेबाबत सरकार सुरक्षेची हमी देते.

फक्त 100 रुपयांत सुरू करा अकाउंट

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत दररोज करण्यात येणारी छोटी रक्कम भविष्यात मोठ्या निधीत रूपांतरित होते. या योजनेत 6.7 टक्के व्याज मिळते. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी Post office RD अकाउंट सुरू करू शकता. या योजनेत तुमच्या इच्छेनुसार गुंतवणूक करू शकता. तुम्ही या योजनेत सिंगल किंवा जॉइंट अकाऊंट करू शकता. या योजनेचा मुदतपूर्तीचा कालावधी 5 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही याजनेची कालावधी 5 वर्षांनी आणखी वाढवू शकता. तुम्ही मुदत वाढवून योजनेतून चांगला परतावा मिळवू शकता.

तुम्हाला रिकरिंग डिपॉजिटमध्ये स्कीममध्ये 15 लाखांची निधी तयार करण्यासाठी दररोज 300 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामुळे तुमची महिन्याला 9000 रुपये बचत होईल. तुम्ही 5 वर्ष गुंतवणूक केल्यास तर एकूण निधी 5.4 लाख रुपये इतका होईल. तर त्यात व्याज हे 102291 रुपये इतके असेल. तुम्हाला ठेवीतील रक्कम काढण्याची आवश्यकता नसेल. तर तुम्ही आणखी 5 वर्षांसाठी गुंतवणूक वाढवू शकता. त्यामुळे 10 वर्षात तुमचा निधी 10.80 लाख रुपये इतका होईल. तुम्हाला योजनेतूनच 4.57 लाख रुपये मिळतील. त्यामुळे तुमचा एकूण निधी 1537692 रुपये इतका होईल.

तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत खाते उघडायचे असेल. तर तुम्हाला काही नियम जाणून घेणे गरजेचे आहे. तुम्ही या गुंतवणुकीचा हप्ता वेळेवर भरायला लागेल. तुम्ही हप्ता वेळेवर भरला नाही, तर तुम्हाला दरमहा 1 टक्के दंड भरावे लागेल. तुम्ही सलग 4 हप्ते चुकवल्यास तुमचं आरडी खाते बंद होईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
  • मोठी बातमी! लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार? वन नेशन वन इलेक्शनबाबत मोठी अपडेट!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in