• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट

July 23, 2026 by admin Leave a Comment


NEET पेपरफुटी प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी पेपरफुटीच्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली.

दिल्लीतील CJP आंदोलन आणि NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वाची भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य हे केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, “देशातील तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य यापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नाही. प्रश्नपत्रिका फुटीच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

याशिवाय, अशा प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. संबंधित विभागांना आवश्यक ती तातडीची कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका होत असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच सार्वजनिक भूमिका घेतल्याने या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पेस्टल जांभळ्या पैठणी साडीत प्रतिक्षा मुणगेकरचा रक्षाबंधनासाठी खास लूक, फोटोंनी वेधलं लक्ष
  • नेपाळनंतर आता भारताच्या डोक्यावरही संकट? देशातील ‘त्या’ 5 सरोवरांनी वाढवली चिंता!
  • 320 भारतीय अजूनही बेपत्ता, टेन्शन वाढले, परराष्ट्र मंत्रालयाची मोठी माहिती..
  • सोनम वांगचुक-अभिजीत दिपके जोडी पुन्हा दिसणार? CJP ला पाठिंबा देण्याबाबत वांगचुक यांचं मोठं विधान
  • Baba Vanga : नेपाळच्या महापुरानंतर आता सर्वात मोठं संकट, बाबा वेंगांच्या नव्या भाकीताने जगभरात खळबळ, चिंता वाढली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in