
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि प्रेमाचा सण म्हणून भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्वाचा मानला जातो. श्रावण पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते.
यंदाच्या रक्षाबंधनासाठी मराठी अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकरने देखील खास पारंपरिक लूक केला होता. या खास दिवसासाठी प्रतिक्षाने पेस्टल जांभळ्या रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली होती.
या साडीवर तिने लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता. पारंपरिक साडी आणि त्याला दिलेला आधुनिक टच यामुळे तिचा लूक आकर्षक दिसत होता.
प्रतिक्षाने या लूकसोबत फारसा भडक मेकअप न करता हलका आणि साधा मेकअप केला होता. तसेच मोजकेच दागिने परिधान करत तिने आपला लूक खुलवला. तिच्या साध्या, पण देखण्या पारंपरिक अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, प्रतिक्षा मुणगेकर सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती ‘ऐश्वर्या’ हे नकारात्मक पात्र साकारताना दिसत आहे.




Leave a Reply