• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Baba Vanga : नेपाळच्या महापुरानंतर आता सर्वात मोठं संकट, बाबा वेंगांच्या नव्या भाकीताने जगभरात खळबळ, चिंता वाढली

August 28, 2026 by admin Leave a Comment


नेपाळवर आलेलं महापुराचं संकट आणि सध्या जगभरात आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर आता पुन्हा एकदा बुल्गारियाच्या भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांची आणखी एक हादरून सोडणारी भविष्यवाणी समोर आली आहे. सोशल मिडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात येत आहे की, 2026 संदर्भात बाबा वेंगा यांनी ज्या -ज्या भविष्यवाणी केल्या होत्या, त्या आता खऱ्या ठरताना दिसून येत आहेत. बाबा वेंगा याच्या भविष्यवाणीनुसार यंदा पृथ्वीच्या सात ते आठ टक्के भू भागावर भीषण नैसर्गिक संकटं येणार आहेत, यामुळे जगभरात हाहाकार उडेल असं भाकीत त्यावेळी बाबा वेंगा यांनी वर्तवलं होतं. हे भाकीत आता नेपाळमध्ये आलेल्या महापुराच्या निमित्ताने खरं होत असल्याचा दावा सोशल मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

बाबा वेंगा यांनी 2026 संदर्भात जी दुसरी मोठी भविष्यवाणी केली आहे, ती म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता. बाबा वेंगा यांच्या या भाकितानुसार 2026 या वर्षांच्या शेवटापर्यंत हळुहळु परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल आणि त्यानंतर हीच परिस्थिती तिसऱ्या महायुद्धामध्ये बदलू शकते असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या मध्य पूर्वेत प्रचंड तणाव आहे, अमेरिका, इस्त्रायल आणि इराण आमने-सामने आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. तर दुसरीकडे चीनकडून देखील तैवानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सध्या जगात मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे आता जगात खरंच तिसरं महायुद्ध होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर 2026 च्या नोव्हेंबर महिन्यात एलियन्स पृथ्वीवर येऊ शकतात, असंही भाकीत बाबा वेंगा यांनी केलं आहे. 2026 मध्ये प्रथमच एलियन्स आणि मानव आमने-सामने असू शकतात, असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं. दरम्यान दुसरीकडे सात ऑगस्ट रोजी अमेरिकेकडून हवेत उडणारी अज्ञात वस्तू (UFO) शी संबंधित काही गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आले आहेत. मात्र एखादी अज्ञात वस्तू दिसणं म्हणजे ते एलिएन्सच असतील याची कोणतीही खात्री देता येत नाही, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सर्वसामन्यासाठी आनंदाची बातमी! अखेर साखरेच्या दरात मोठी घसरण; किती रुपयांनी घट झाली?
  • जापानमध्ये असं कसं? तंबूत ड्रेसिंग रूम आणि वॉशरुम 500 मीटर दूर! एशियन्स गेम्स व्यवस्थेवर बीसीसीआयची नाराजी
  • 260 वर्ष जुना रस्ता पापणी लवताच नेस्तनाबूत… महापुराने नेपाळची लाइफलाइनच केली उद्ध्वस्त
  • CM मोटारीने आले म्हणून नाशकातील खड्डे… भर मंचावरून छगन भुजबळांचा महाजनांना टोला, नेमकं काय म्हणाले?
  • टूथब्रशवरुन शोधून काढलं पत्नीचं सिक्रेट अफेअर, 15 लाख, केस जिंकला पण एक अशी चूक केली त्यामुळे उलट तोच गेला तुरुंगात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in