• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Petrol Diesel Price : मोठी खळबळ! कच्च्या तेलाच्या किमतीत थेट वाढ, आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा..

July 15, 2026 by admin Leave a Comment


Petrol Diesel New Rate : इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना टार्गेट केले जातंय. त्यामध्येच जागतिक बाजारात यामुळे खळबळ उडाली. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. युरोपीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे भाव तीन टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल 86 डॉलर्सच्या वर गेले. भारताच्या शेजारील देशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. भारतीय तेल कंपन्यांवरही या वाढणाऱ्या भावामुळे दबाव वाढला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात अजून काही दिवस तणाव वाढला तर त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होईल. इराण आणि अमेरिका युद्धात चार वेळा केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या होत्या. त्यातच आताही जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत.

यादरम्यानच तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले. बुधवार 15 जुलै 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आली नाहीत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणातीही वाढ केली नाही. मात्र, मोठे नुकसान तेल कंपन्यांना सहन करावे लागत आहे.

तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, पेट्रोलचा दर प्रति लिटर आज मुंबईत 111.21 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.12 रुपये आहे. कोलकातामध्ये हा दर 113.51 रुपये चेन्नईमध्ये 107.77  रुपये इतका आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, बुधवारी दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 95.20 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये हा दर प्रति लिटर 99.02रुपये, मुंबईत 97.83 रुपये आणि चेन्नईमध्ये 99.55 रुपये आहे.

अलीकडच्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इराणशी संबंधित संघर्ष सुरू झाल्यापासून या किमतीत जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष कमी व्हावा ही जगाची इच्छा आहे. मात्र, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर हल्ले सुरू झाली. होर्मुज खाडीत जहाजांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप अमेरिकेने केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उंदराचा पाठलाग करत ऑपरेशन थिएटरमध्ये शिरला साप, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक..
  • मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
  • लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
  • नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
  • ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’मधील काश्मीरी पंडितांवरील वक्तव्यावरून समय रैनावर टीका; राम कदम आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in