• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Petrol and diesel prices today : तेलाच्या किंमतीत थेट मोठी वाढ, जाणून घ्या आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर..

August 31, 2026 by admin Leave a Comment


जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सतत उढउतार बघायला मिळत आहेत. त्यातच आता पुन्हा तेल भडकले आहे. तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. ज्यामुळे तेल कंपन्यांवरील तणाव वाढला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असतील तरीही भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. भारत 85 टक्के पेट्रोल-डिझेल इतर देशांकडून मागवतो. तेल कंपन्यांनी नुकताच 31 ऑगस्टच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर केल्या. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती 90 डॉलर प्रति बॅरल पोहोचल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेंट क्रूडच्या किंमतीत 2.52 टक्क्यांनी वाढ होऊन ती प्रति बॅरल 90.32 डॉलरवर पोहोचली आहे.

अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट क्रूडचा भाव 2.41 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 85.41 डॉलरवर व्यवहार करत आहे. अमेरिकेने इराणच्या लराक द्वीपवर हल्ला केला. रॉकेटला टार्गेट करत हा हल्ला करण्यात आला. ज्यानंतर इराणने थेट अमेरिकेच्या लष्कर स्थळावर तात्काळ हल्ला केला. ड्रोन हल्ला करण्यात आला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत.

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, हा तणाव जर वाढत राहिला तर जागतिक बाजारात कच्च्या तेल वाढतील. भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका युद्ध पेटले. इराण आणि अमेरिका युद्धात काही महिने होर्मुज खाडी बंद होती. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशात कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला. अमेरिकेकडून होर्मुज खाडी आमची असल्याचा दावाही केला जात आहे.

आज मुंबईत पेट्रोल 111.31 रुपये तर डिझेल 97.97 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल 02.12 रुपये, डिझेल 95.20 रुपये प्रति लीटर आहे. कोलकाता 113.51 रुपये प्रति लिटर  पेट्रोल तर डिझेल 99.82 रुपये आहे. चेन्नई 107.78 रुपये पेट्रोल तर डिझेल 99.56 रुपये लीटर आहे. हैदराबाद येथे पेट्रोल 115.69 रुपये तर डिझेल 103.82 रुपये आहे. पटना येथे पेट्रोल 113.35 रुपये तर डिझेल 99.36 रुपये लीटर आहे. इराण आणि अमेरिका युद्धात भारतात चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat case Update: मोठी अपडेट! अशोक खरात प्रकरणी आज होणार मोठा निर्णय, नेमकं काय घडणार?
  • हा नुसता माज नाही तर… अमेरिकेतला तिरंग्याचा तो व्हिडीओ व्हायरल, भारतीय लोकांमध्ये तीव्र संताप, थेट..
  • Sunny Deol : सनी देओलला मुस्लीम दाखवल्यामुळे ‘बंटवारा 1947’ ला मोठा फटका? दिग्दर्शकाने सोडलं मौन
  • Abhijeet Dipke: BJP ला वाटतं की ते RSS पेक्षा मोठं आहेत, मोदी यांनी…अभिजीत दिपके यांचा सरकारवर निशाणा
  • Shivsena | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! मिशन टायगरमधून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in