• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke: BJP ला वाटतं की ते RSS पेक्षा मोठं आहेत, मोदी यांनी…अभिजीत दिपके यांचा सरकारवर निशाणा

August 31, 2026 by admin Leave a Comment


Abhijeet Dipke CJP: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी भाजपला आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे म्हणणे ऐकण्याचे आवाहन केले. सत्ताधारी पक्ष स्वतःला संघटनेपेक्षा मोठा समजू लागला आहे, असा आरोप त्यांनी केला. न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी, ‘ज्या हिंदूचा असा विश्वास आहे की मुस्लिमांनी भारतात राहू नये, ते मुळातच स्वत:ला हिंदू समजू नये.” मोहन भागवत यांच्या विधानानंतर अभिजीत दिपके यांनी भाजपाला पुन्हा टोला लगावला आहे.

अभिजीत दीपके म्हणाले, “मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे की भाजपने मोहन भागवत यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. १२ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर आणि अनेक यंत्रणांवर नियंत्रण मिळवल्यानंतर भाजपला आपण आरएसएसपेक्षा मोठे झालो आहोत असे वाटते. तसेच भागवत यांनी यापूर्वी म्हटले आहे की आंदोलन करणाऱ्या ‘Gen z’ तरुणांना देशद्रोही म्हणू नये.”

दीपके म्हणाले, “पण पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) ‘दिमागी नक्षल’ ही नवीन संज्ञा वापरली. यावरून हे स्पष्ट होते की पंतप्रधान मोहन भागवत यांचे ऐकत नाहीत. एकीकडे आरएसएस प्रमुख समाजात सर्वांना सोबत घेऊन जाण्याबद्दल आणि मुलांचा अपमान न करण्याबद्दल बोलतात, तर दुसरीकडे पंतप्रधान असे शब्द वापरतात. हे चांगले दिसत नाही, त्यांनी किमान त्यांचे गुरू मोहन भागवत यांचे तरी ऐकले पाहिजे. आरएसएसमुळेच भाजप सत्तेत आहे.”

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित युनिव्हर्सल वननेस सेलीब्रेशन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी धर्म, मानवता आणि हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवर आर्वजून भाष्य केले. मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात केलेल्या विधानाची आता सर्वत्र चर्चा होत आहे, ते म्हणाले की, “मी धर्माचा तज्ज्ञ नाही किंवा तुमच्यासारखा धर्माचा जाणकारही नाही. मात्र, मी अशा समाजात राहतो, काम करतो, जो पारंपरिकरित्या असे मानतो की धर्म वेगवेगळे असले तरी मानवताही नेहमीच एक आहे.”



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune | पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक; फडणवीस-रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांची रणनीती ठरणार?
  • फक्त चिमुटभर मिठ, 5 मिनिटांत बरी होईल डोकेदुखी, जाणून घ्या रामबाण उपाय
  • tv9 Marathi Special Report | मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा; शिंदेंच्या सभेत काळे झेंडे अन् घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
  • Shaktiman: रणवीरकडून 3 तास मनधरणी, ‘शक्तिमान’साठी हातात होता कोट्यवधींचा चेक; तरी मुकेश खन्ना यांनी दिला नकार
  • समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 10 प्रवासी गंभीर जखमी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in