• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ashok Kharat case Update: मोठी अपडेट! अशोक खरात प्रकरणी आज होणार मोठा निर्णय, नेमकं काय घडणार?

August 31, 2026 by admin Leave a Comment


नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर येताच राज्यात खळबळ माजली होती. अनेक महिलांचे शोषण करुन त्यांच्या अत्याचार करणाऱ्या अशोक खरातचे अनेक व्हिडीओ समोर आले. त्यानंतर अशोक खरातला अटक करण्यात आली. गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या अशोक खरात प्रकरणी आज मोठी सुनावणी होणार आहे. खरातच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

17 गुन्हे दाखल

लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांप्रकरणी अशोक खरात सध्या कारागृहात आहे. मार्च महिन्यात अशोक खरातचे काळे कारनामे समोर येताच त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. यापैकी १२ गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे.

आज होणार कोर्टात सुनावणी

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अशोक खरात प्रकरणात सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम बाजू मांडणार आहेत. अशोक खरात प्रकरणात ॲड. निकम पहिल्यांदाच सरकार पक्षाची बाजू मांडणार आहेत. सरकारने त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून जून महिन्यात नियुक्ती केली होती. तपास यंत्रणेकडून पुरावे आणि साक्षीदारांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे. सरकार पक्षाकडून खरातच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय जामीन अर्जावर निर्णय घेणार आहे. पीडितांसह नाशिककर आजच्या सुनावणीच्या निष्कर्षाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

खरातचे तुरुंगात विचित्र चाळे

अशोक खरातच्या या विचित्र वागण्यामुळे पोलीस यंत्रणाही थक्क झाली आहे. कोठडीत बसून मंत्रजप करणे, विचित्र पुटपुटणे आणि स्वतःच्या कृत्यांचे दैवी विधी म्हणून समर्थन करणे, यावरून तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, नाशिक पोलिसांनी तसेच एसआयटीने त्याच्या तपासाचा फास अधिक घट्ट केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bandra Accident | मोबाईलवर बोलत कार चालवणं जीवावर बेतलं! वांद्र्यात भरधाव कारची चिमुरड्याला धडक; अंशचा दुर्दैवी मृत्यू
  • शिंदे गट सुप्रीम कोर्टाच्या आगामी निकालाला मंत्री, आमदार घाबरले का? सचिन अहिर यांच्याकडून मोजक्या शब्दात प्रत्युत्तर
  • Sanjay Raut : बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष..संजय राऊतांनी उपकारांची करुन दिली आठवण
  • Nashik | तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर! मध्यरात्रीपासून भाविकांची तुफान गर्दी
  • शिंदेंची नजर मुंबई बँकेवर, नव्या राजकीय समीकरणांची शक्यता..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in