• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pakistan Cricket : टीम इंडियाला हरवलं, मोठा जल्लोष केला; पण त्यानंतरच आमची वाट लागली, मोहम्मद यूसुफचा मोठा खुलासा

September 6, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तान क्रिकेटचा सध्या वाईट काळ सुरु आहे. पुरुषांच्या टीमला इंग्लंडकडून कसोटी मालिकेत सातत्याने पराभवाचा सामना करावा लागतोय. तर दुसरीकडे आशिया कपमध्ये भारताच्या वाघिणींनी महत्त्वाच्या सामन्यामध्ये महिला संघालाही हरवलं आहे. पाकिस्तानचं हे पराभव सत्र काही थांबायचं नाव घेत नाही.

गेल्या काही वर्षांमधील अनेक मोठ्या मालिकांचा विचार केल्यास पाकिस्तान फारशी चांगली कामगिरी करु शकलेला नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, पाकिस्तानच्या या वाईट काळाची सुरुवात नेमकी कधी झाली. तर याच उत्तर पाकिस्तानच्या माजी कर्णधारानेच दिलं आहे. होय, मोहम्मद यूसुफने यावर भाष्य केलं आहे. तो जे काही बोललाय ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

यूसुफ यांच्या मते 2021 मधील टी20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध मिळालेला मोठा विजय हाच कारण ठरला आहे. 10 विकेट्सने मिळवलेला विजय पाकिस्तानचे खेळाडू पचवू शकले नाही.

भारताविरुद्ध मोठा विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू हवेत गेले होते. त्या सामन्यात दुबईमध्ये बाबर आणि रिजवानने 152 धावांचं आव्हान पूर्ण केलं होतं. वर्ल्डकपमधील हा पाकिस्तानचा पहिला विजय होता. त्यामुळे सगळा पाकिस्तान आनंदात होता, मोठा उत्सव करत होता.

दरम्यान, आता पाच वर्षांनंतर यूसुफ यांचं मत आहे की, याच विजयाने पाकिस्तानच्या टीमचं मोठं नुकसान केलं. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलं की, “पाकिस्तानच्या संघाला असं वाटत होतं की हा खूप मोठा विजय आहे. पण कोणीही पुढील नियोजनाचा विचार केला नाही. जेव्हा तुम्ही चांगलं खेळता तेव्हा तुम्ही हवेत न जाता पुढील नियोजनावर काम केलं पाहिजे. पण आमच्या संघातील खेळाडूंनी कॉलर उडवली. खूप घमंड आलं होतं. जेव्हा तुम्ही इतरांचा अपमान करता त्यांची इज्जत करत नाही तेव्हा तुम्हीही निश्चितच अडचणित येता. पाकिस्तानसोबत नेमकं हेचं झालं”

एवढंच नाही तर पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की या विजयानंतर प्रत्येकाला कर्णधार व्हायचं होतं. त्यामुळे टीममध्ये गटबाजी तयार झाली. त्याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला. कोच बदलले, कर्णधार बदलले. बोर्डचा खेळाडूंना पाठिंबा आहे. पण खेळाडू जबाबदारीने खेळत नाहीत, असं मत यूसुफ यांनी मांडलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ घडला धक्कादायक प्रकार
  • मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन्…
  • Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल, उपचार देण्याचा प्रयत्न…
  • Strong Beer : ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
  • शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाण्यांचा खजाना पाहून डोळे चमकले..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in