• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nitin Gadkari : ..तर डायरेक्ट लायसन्सचं रद्द होईल, नितीन गडकरी आणत असलेला पॉइंटचा नवीन नियम काय?

September 9, 2026 by admin Leave a Comment


सातत्याने वाहतूक नियम तोडणाऱ्यांना आता मोठा दणका बसणार आहे. अशा वाहनधारकांचे केवळ चालान कपात होणार नाही. सरकार निगेटिव्ह पाईंट सिस्टिम लागू करणार आहे. ही नवीन सिस्टिम लागू झाल्यानंतर प्रत्येक चुकीसाठी वाहन परवाना(Driving Licence) आणी आरसी (Registration Certificate) मधून गुण कापले जातील, पाईंट कापले जातील. ही संख्या वाढल्यावर डायरेक्ट लायसन्सचं रद्द करण्यात येईल, याविषयीची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकार कठोर पावलं टाकत असल्याची माहिती 66 व्या सियामच्या (SIAM) वार्षिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी दिली.

नवीन पॉईंट सिस्टिम कशी काम करणार?

मंत्री नितीन गडकरी यांच्या माहितीनुसार, त्यांचे मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाच्या आरसी बुकसाठी एक ग्रेडेड पाईंट सिस्टिम सुरू करण्याची योजना आणत आहे. नवीन फ्रेमवर्क अंतर्गत कोणताही चालक जेव्हा ट्रॅफिक नियम तोडेल तेव्हा तो त्याच्या परवान्यातून पॉईंट कापण्यात येतील. जेव्हा एका निश्चित मर्यादा ओलांडली जाईल, तेव्हा पोलीस अथवा वाहतूक प्रशासन त्या वाहनधारकांचे लायसन्स रद्द करू शकतील. वारंवार वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी ही ग्रेडेड पाईंट सिस्टिम उपयोगी ठरणार आहे.

चांगल्या ड्रायव्हरला फायदा

ही नवीन ग्रेडेट पाईंट सिस्टिम केवळ शिक्षा देण्यासाठीच आणली जात आहे असे नाही. तर चांगल्या वाहन चालकालाही त्याचा फायदा होईल. ज्या ड्रायव्हरचा रेकॉर्ड चांगला असेल त्याला बक्षीस देण्यात येईल. अशा वाहन चालकांना विमा कंपन्या प्रीमियममध्ये मोठी सवलत देतील. इतर वित्तीय फायदे देण्याचीही योजना आहे. चांगल्या आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांमध्ये फरक करण्याची सरकारची योजना आहे. चुका सुधाराव्यात आणि रहदारीच्या नियमांचे पालन करावे यासाठी मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

जुन्या वाहनांसाठी मोठी घोषणा

या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी जुन्या बीएस 4 (BS IV) वाहनांविषयी मोठी घोषणा केली. सरकार एक नवीन ॲमिशन कंट्रोल डिव्हाईस आणण्याच्या तयारीत आहे. त्याची किंमत जवळपास 4000 ते 5000 रुपयांच्या दरम्यान असेल. नवीन यंत्राची चाचणी पूर्ण झाली आहे. हे डिव्हाईस जुन्या वाहनांना लावल्यावर प्रदूषण आणि धूराचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे नवीन बीएस 6 (BS VI) इतके असेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rohit Pawar : राहुल नार्वेकर पक्षांतर बंदी कायदा अधिक प्रभावी बनवणार, त्यापेक्षा त्यांनी..रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
  • Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
  • 61 वर्षांपूर्वीचं गाणं, जे ऐकताच लहान मुलं लगेच झोपी जातात, आजही हे गाणं महिला..
  • LPG Cylinder: एलपीजी सिलिंडर 400 रुपयांनी कमी होणार, तर सब्सिडी वाढणार? Report समोर
  • नागोठाणे उड्डाणपुलाच्या सिमेंटच्या प्लेट्सवर काचेच्या पट्ट्या; व्हिडीओ व्हायरल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in