• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NEET Paper Leak : मोटेगावकरांचा तो प्रस्ताव… रडारवर श्रीमंत विद्यार्थी, चाचणीही घेतली; अखेर मोठा गौप्यस्फोट झालाच…

May 23, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नवीन नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 10 लोकांना अटक केली आहे. यातील सहाजण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. लातूरमधून शिवराज मोटेगावकरला अटक केली आहे. मोटेगावकर हा आरसीसी क्लासचा संस्थापक आहे. लाखो रुपये घेऊन त्याने विद्यार्थ्यांना नीटचा पेपर दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मोटेगावकर हा श्रीमंत विद्यार्थ्यांना हेरत असल्याची माहितीही समोर आली आहे. त्याचे अजूनही कारनामे उघड झाले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. मोटेगावकर विद्यार्थ्यांना एक प्रस्ताव देत असल्याचं समोर आलं आहे. धाराशिवचे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी याबाबतचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

धाराशिवच्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मीडियासमोर शिवराज मोटेगावकरची पोलखोल केली आहे. त्यांनी धक्कादायक दावा केल्याने धाराशिव आणि लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर हा धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना “चांगल्या मार्गाने पास” करण्याचा प्रस्ताव घेऊन आला होता, असा गौप्यस्फोट आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केला आहे. धाराशिवमधील काही श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांची आरोपी शिवराज मोटेगावकरने स्वतंत्र चाचणी घेतल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे.

याचिका दाखल करणार

नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीए विरोधात काही शिक्षण संस्थांचे संस्थापक एकत्र येऊन जनहित याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे या याचिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. शिक्षण संस्थांचे संस्थापक कोर्टात काय युक्तिवाद करणार? कोर्ट त्यावर काय निर्णय देते या सर्व गोष्टींकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

कोण कोण अटकेत?

मनीषा वाघमारे – महाराष्ट्रातील राहणारी. ब्युटिशियन आहे. विद्यार्थ्यांना पेपर फोडणाऱ्या रॅकेटपर्यंत घेऊन जाण्याचा तिच्यावर आरोप आहे. या विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरपर्यंत नेण्याचं काम मनीषा वाघमारे करायची.

पीव्ही कुलकर्णी – महाराष्ट्रातील केमिस्ट्रीचा प्राध्यापक. विद्यार्थ्यांना पेपर पूर्वी प्रश्न सांगण्याचा त्याच्यावर आरोप आहे.

धनंजय लोखंडे – हाही महाराष्ट्रातील. मनीषा वाघमारेकडून पेपर खरेदी करायचा आणि मोठी रक्कम घेऊन विद्यार्थ्यांना विकायचा.

शुभम खैरनार – हा महाराष्ट्रातील असून पेशाने दलाल आहे. याने धनंजय लोखंडेकडून पेपर घेऊन टेलिग्रामवर लाखो रुपयांना विकला.

यश यादव – याने शुभम खैरनारकडून 15 लाख रुपयात पेपरची पीडीएफ मागितली.

मांगीलाल बिंवाल – हा सुद्धा अटकेत आहे. त्यानेही शुभमकडून आपल्या मुलासाठी पेपर खरेदी केला. मांगीलालने नीट पेपर घेण्यासाठी शुभमशी 45 लाख रुपयाची डील केली.

दिनेश बिंवाल – दिनेश हा मांगीलालचा भाऊ आहे. तोही या रॅकेटचा एक भाग आहे. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.

विकास बिंवाल – विकास हा मांगीलालचा मुलगा आहे. त्यालाही अटक करण्यात आली आहे. विकास स्वत: एमबीबीएसचा विद्यार्थी आहे. तोही या पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आहे.

मनीषा गुरुनाथ मंधारे – मनीषा मंधारे ही महाराष्ट्रातील आहे. तिलाही अटक करण्यात आली आहे. ती जीवशास्त्राची प्राध्यापिका आहे. विद्यार्थ्यांना लिक झालेल्या पेपरचे उत्तर दिल्याचा तिच्यावर आरोप आहे.

शिवराज रघुनाथ मोटेगावकर – शिवराज रघुनाथ मोटेगावकर हा रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचा संस्थापक आहे. तो मूळचा लातूरचा आहे. त्यानेही विद्यार्थ्यांना लाखो रुपयांना पेपर विकल्याचा आरोप आहे.

मनीषा संजय हवालदार – पुण्याच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेची मुख्याध्यापिका आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने मनीषा हवालदारची ‘भौतिकशास्त्र’ (Physics) विषयाची तज्ज्ञ म्हणून टीममध्ये नियुक्ती केली होती. तिच्यावरही पेपर फोडल्याचा आरोप आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सावध व्हा… शुक्र-केतू युती; जुलै महिन्यात ‘या’ 4 राशींना बाळगा सावधगिरी…
  • Vaibhav Sooryavanshi: तो एक सल्ला अन् श्रीलंकेला हादरवून सोडलं, वैभवच्या रेकॉर्डब्रेक खेळीमागे एक मराठी माणूस जबाबदार
  • देवस्थान इनाम जमीन कायदा लवकरच येणार, पहिल्या बैठकीत रुपरेषा ठरली
  • आयुष्यातील सर्वांत वाईट सकाळ..; मराठी अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट
  • विद्यार्थ्याने अंडरगारमेंटमध्ये लपवलेले सिम कार्ड अन् मागच्या वर्षीचा पेपर…Neet पुर्नपरीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in