
कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही९ मराठी, मुंबई : मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार त्यापूर्वीच त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत झालेला घोळ समोर आला. दरम्यान आता या सर्व प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. आरोपी रोहन पारेख हा त्याच्या प्रेयसीसाठी जिओ वर्ल्ड सेंटर प्लाझामध्ये परफ्यूम खरेदीला गेल्याचा दावा केला जात आहे. नेमकी त्याचवेळी पीएमओच्या एसपीजीने त्याला अडवून चौकशी केली. आरोपीने स्वतःला आपण पीएमओ कार्यालयातील अधिकारी आहोत, असं सुरक्षा यंत्रणांना सांगितलं, त्यानंतर यंत्रणांनी तत्काळ चौकशीला सुरुवात करुन त्याची तपासणी केली.
पुढे काय घडलं?
यावेळी त्यांनी त्याच्याकडील उपकरणांचीही तपासणी केली. त्याच्या मोबाईलमध्ये पीएमओ कार्यालयातील बनावट आयडी स्वरुपाचा फोटो आढळून आला. एवढच नाही तर त्याच्यासोबत असलेल्या बॉडीगार्डकडं बंदूकही आढळून आली. त्यामुळे मुंबई क्राईम ब्रांचकडून त्याला तत्काळ अटक करण्यात आली. रोहन खरंच त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता का आणि त्याची गर्लफ्रेंड नेमकी कोण? ती जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये काय करत होती, असे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.
वकिलांचा कोर्टात वेगळाच दावा
दरम्यान, दुसरीकडे आता रोहनचे वकिल कोर्टात पोहोचले आहेत. त्यांनी कोर्टात वेगळाच दावा केला आहे, ज्यामुळे या प्रकरणात माेठा ट्विस्ट आला आहे. PMOच्या कथित बनावट ई-मेलद्वारे रोहनला अडकवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी तरुण गुप्ता नावाच्या व्यक्तीने रोहन पारेखला PMOमध्ये नोकरीची ऑफर दिल्याचा मोठा दावाही केला आहे. यानंतरच रोहनला पीएमओचे कथित डिजिटल ओळखपत्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र मिळाले असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले आहे.
दरम्यान, रोहनने लंडनमध्ये शिक्षण घेतले असून, जिओ-पॉलिटिक्स आणि डिफेन्स पॉलिसीवर त्याने काम केल्याचा वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. रोहन स्वतः या कथित फसवणुकीचा पीडित असल्याचा वकिलांकडबव कोर्टात युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यानंतर आता तरुण गुप्ता नावाच्या व्यक्तीची या प्रकरणातील भूमिका नेमकी काय तपासण्याचे काम सुरू. बनावट कागदपत्रे तयार करणारे आणि तसेच फरार प्रथमेश बागुल याचा शोध सुरू आहे.
Leave a Reply