• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सपना चौधरीचं 8 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्यावरील डान्स पाहण्यासाठी लोक पत्र्यांवर चढायचे

September 8, 2026 by admin Leave a Comment


सपना चौधरीचं 8 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्यावरील डान्स पाहण्यासाठी लोक पत्र्यांवर चढायचे

हरियाणवी लोकगीत आणि डान्सच्या दुनियेत सपना चौधरी हे नाव आज कोणत्याही परिचयाची गरज नसलेलं आहे. आपल्या खास डान्सने आणि दमदार स्टेज परफॉर्मन्सने सपनाने अनेक हरियाणवी गाणी लोकप्रिय केली. मात्र, एका गाण्याने तिच्या करिअरला अशी कलाटणी दिली की ती रातोरात स्टार झाली. हे गाणं म्हणजे ‘तेरी आंख्या का यो काजल’. आजही या गाण्याचे सूर कानावर पडताच प्रेक्षकांना ठेका धरल्याशिवाय राहवत नाही.

2018 मध्ये सोनोटेकच्या बॅनरखाली ‘तेरी आंख्या का यो काजल’ हे गाणं रिलीज झालं. गाणं प्रदर्शित होताच त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. डीसी मदाना यांचा दमदार देशी आवाज, व्हीआर ब्रॉसचं आकर्षक डीजे म्युझिक आणि वीर ढैय्या व हंसराज रेलहन यांचे शब्द यामुळे गाण्याला वेगळीच रंगत आली. त्यात सपना चौधरीच्या खास ठुमक्यांनी गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

या गाण्यामुळे सपना चौधरी हरियाणाची ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून ओळख मिळाली. तिच्या स्टेज शोची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि तिचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहते दूरदूरवरून येऊ लागले.

यूट्यूबवरही गाण्याचा धुमाकूळ

‘तेरी आंख्या का यो काजल’ने यूट्यूबवरही लोकप्रियतेचे अनेक विक्रम केले. सोनोटेकच्या अधिकृत चॅनेलवरील या गाण्याच्या व्हिडीओला 67 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर या गाण्याच्या विविध व्हर्जन्सचे एकत्रित व्ह्यूज 100 कोटींच्या पुढे गेल्याचं सांगितलं जातं.

विशेष म्हणजे हे गाणं केवळ हरियाणवी प्रेक्षकांपुरतं मर्यादित राहिलं नाही. देशभरातील विविध कार्यक्रमांमध्ये तसेच परदेशातही या गाण्यावर लोक थिरकताना दिसले. विमानातील प्रवाशांपासून ते अॅमस्टरडॅममधील किंग्स डे सेलिब्रेशनपर्यंत या गाण्याची क्रेझ पाहायला मिळाली.

सपनाच्या करिअरला मिळाली मोठी झेप

सपना चौधरीच्या करिअरची सुरुवात फार मोठ्या मानधनाने झाली नव्हती. सुरुवातीच्या काळात तिला स्टेज शोसाठी सुमारे 3100 रुपये मानधन मिळत असल्याचं सांगितलं जातं. मात्र, ‘तेरी आंख्या का यो काजल’च्या यशानंतर तिच्या लोकप्रियतेसोबतच तिच्या करिअरलाही मोठी झेप मिळाली.

यानंतर सपना चौधरीची लोकप्रियता केवळ हरियाणवी संगीतविश्वातच राहिली नाही तर त्या देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या. ‘बिग बॉस 11’ मध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या प्रसिद्धीत आणखी भर पडली. या कार्यक्रमातही तिने ‘तेरी आंख्या का यो काजल’वर डान्स केला आणि तिचा हा परफॉर्मन्स चांगलाच चर्चेत आला.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • DJ च्या वादानंतर विद्यानंद बापट काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत, आता लढ्यासाठी वेगळा मंच, मोठी अपडेट समोर
  • ‘आरक्षणाचं गाजर दाखवून सरकार निवडणुका जिंकतं,’ पण…नाना पटोले यांची टीका
  • सांगलीत स्पर्धा परीक्षा अकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; रात्री झोपेत असतानाच… संतापजनक प्रकार समोर!
  • १५ फूट उंचीची गणपती मूर्ती मंडपात नेताना कोसळली, धारावीत खळबळ
  • ट्रेनमध्ये सीलबंद दारूच्या बाटल्या नेता येतात का? नेमका नियम काय? वाचा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in