
Apoorva Mukhija Kiss Amin Jaz : ‘द ट्रेटर्स’ आणि ‘लॉकअप: सच या सजा’ यांसारख्या शोमध्ये सहभागी झालेली, रिबेल किड या नावाने प्रसिद्ध असलेली अपूर्वा मखिजा (Apurva Mukhija) तिच्या बेधडक अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी अपूर्वाने भारत सोडला आणि शिक्षणासाठी ती न्यूयॉर्कला सेटल झाली. मात्र तिथे राहूनही अपूर्वा सतत लाइमलाइटमध्ये असते. नुकताच अपूर्वा मखिजाचा एक व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यामुळे तिचे चाहते आश्चर्यचकित झालेत. या व्हिडीओमध्ये अपूर्वा ही अमीन जाज ( Amin Jaz) याला लिपलॉक किस करताना दिसली. अपूर्वा आणि अमीन यांचा हा व्हिडीओ समोर येताच दोघांच्या डेटिंगच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
रोमँटिक अंदाजात दिसले अपूर्वा- अमीन
अपूर्वा मखिजा (Apoorva Mukhija) आणि अमीन जाज (Amin Jaz) या व्हिडीओमध्ये रोमान्समध्ये बुडालेले दिसले. एका पार्टीतला हा व्हिडीओ असल्याचा अंदाज आहे. त्यात पहिले अमीन अपूर्वा किस करतो. पण अपूर्वाचं लक्ष दुसरीकडे जातं. मात्र व्हिडीओमध्ये पुढल्या दृश्यात अपूर्वा स्वत: पुढाकार घेत अमीनला लिप किस करते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दोघांच्या नात्याची बरीच चर्चा सुरू आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनीही बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत.
अपूर्वा आणि अमीन यांच्या डेटिंगबद्दल याआधीही अनेक अंदाज व्यक्त करण्यात आले होते. ते दोघे बऱ्याचदा एकत्र स्पॉट झाले. एवढंच नव्हे तर अमीनच्या पॉडकास्टमध्येही अपूर्वा आली होती. त्यावरून, त्यांच्यात फक्त मैत्रीपेक्षा जास्त नातं असल्याचं अंदाज नेटकऱ्यांना वर्तवला होता. आणइ आता त्यांचा हा लिपलॉकचा व्हिडीओही समोर आलाय, ज्यामुळे डेटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय.
Holy shit
Isn’t it Apoorva Makhija, The rebel kid lol
pic.twitter.com/NrM2CLwAjT
— Chota Don (@choga_don) September 8, 2026
कोण आहे अमीन जाज ?
अमीन जाज (Amin Jaz) हा भारतातला एक लोकप्रिया डीजे, म्युझिक प्रोड्युसर , कंटेंट क्रिएटर आणि पॉडकास्टर आहे. ‘अनट्रिगर्ड पॉडकास्ट’ हा त्याचा पॉडकास्ट बराच फेमस आहे. या शोमध्ये अमीन बऱ्याचदा बेधडकपणे इंटरव्ह्यू घेताना दिसतो किंवा जेन झीवर बोलताना दिसतो. दुसरीकडे अपूर्वा मखिजा बद्दल सांगायचं झालं तर अनेक रिॲलिटी शोजसोबत ती काही ओटीटी शोमध्येही सहभागी झाली होती.

Leave a Reply