
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अखेर पावसाने दमदार हजेरी लावली असून, रात्रीपासून अनेक भागांमध्ये रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. दादर, लोअर परळ, सायन या परिसरांसह अंधेरी, जोगेश्वरी आणि बोरिवली परिसरातही पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हवामान विभागाने पुढील काही तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पावसाचा मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर कोणताही मोठा परिणाम झालेला नसून, वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a Reply