• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Railway Megablock : लोकल प्रवाशांसाठी मोठी अपडेट! रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा

July 18, 2026 by admin Leave a Comment


वर्षाचे 365 दिवस अविरत धावणाऱ्या, लाखो मुंबईकरांना इच्छित स्थळी सुखरुपपणे पोहोचवणारी मुंबईकांची लाईफलाइन, अर्थात रेल्वे. मुंबईतील मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरील जलद लोकल आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे. म्हणूनच रविवारी बाहेर पडण्याच्या विचारात असलेल्या प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

कुठे असणार मेगाब्लॉक ?

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी ८.०० ते दुपारी १.३० या वेळेत मेगा ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत या मार्गिकेवरील अप आणि डाऊन दिशेच्या सर्व रेल्वेगाड्या जलद मार्गावरून वळविण्यात येतील. परिणामी जलद मार्गावर अतिरिक्त रेल्वे वाहतूक होणार असल्याने तेथील लोकल सेवा काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता असून अनेक गाड्या विलंबाने धावू शकतात.

याशिवाय, ट्रान्स हार्बर मार्गावरही ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात वाशी–नेरूळ–ठाणे दरम्यानच्या दोन्ही दिशेतील लोकल सेवा पूर्णपणे रद्द राहतील.

या ब्लॉकमुळे ठाणे स्थानकावरून वाशी, नेरूळ आणि पनवेलच्या दिशेने सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ या वेळेत सुटणाऱ्या सर्व डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल, नेरूळ आणि वाशी येथून ठाण्याच्या दिशेने सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ या वेळेत सुटणाऱ्या सर्व अप लोकल सेवाही रद्द राहतील.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा वापर करण्याचा किंवा प्रवासाचे वेळापत्रक ब्लॉकनुसार आखण्याचा सल्ला दिला आहे. ब्लॉकदरम्यान रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने सुरू राहणार असली, तरी काही गाड्यांना विलंब होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या अद्ययावत सूचनांकडे लक्ष ठेवावे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
  • मोहन भागवत अमेरिकेत जाण्यापूर्वीच राऊत यांचा काय सल्ला? नेमकं काय म्हणाले?
  • ‘काही निहायती गवार लोक…’ मराठी भाषेच्या वादावरुन मनसेवर भडकली अभिनेत्री
  • Insta-Facebook या काळात वापरताच नाही येणार कारण तरी काय? मोठी अपडेट समोर
  • Mahayuti Govt : मित्र पक्षांना सोबत ठेवायचय, त्यामुळे..भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राज्यातील भाजपं नेत्यांना महत्वाचा संदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in