
राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये योग्य समन्वय आहे. पण स्थानिक पातळीवर काही कुरबुरी, मतभेद आहेत. महायुतीतल्याच पक्षांमध्ये आपसात संघर्ष, स्पर्धा आहे. पुणे महानगरपालिकेत निधी वाटपावरुन भाजपं आणि सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपसातील संघर्ष, मतभेद समोर आले आहेत. अगदी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यापर्यंत वाद वाढला. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील प्रमुख भाजपं नेतृत्वाला महत्वाचा संदेश दिला आहे. “महाराष्ट्रात मित्र पक्षांना सोबतच ठेवायचं आहे. दूजाभाव नको, नीधी वाटपात भेदभाव नको, योग्य समन्वय योग्य ठेवा” असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील प्रमुख भाजपं नेतृत्वाला निर्देश दिल्याची खात्रीलायक माहिती आहे.
दिल्लीत जेन झी चं आंदोलन झालं. राज्यात भाजपकडे जास्त जागा आहेत. पूर्ण बहूमताचं सरकार असलं तरी देखील विरोधक आक्रमक होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मित्र पक्षांना सोबतच ठेवायचं. 2029 च्या तयारीला आत्तापासूनच लागा आणि सर्व झेन जी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे महायुती सरकारला दिशा निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतची महत्वाची बैठक लवकरच दिल्लीत होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
महापालिकेतला हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
पुणे महापालिकेत निधी वाटपाच्या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. एकत्र सत्तेत असलेले भाजपं आणि राष्ट्रवादी काँग्रेस परस्परांच्या विरोधात आहेत. भाजपाचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली. त्यानंतर सुनील टिंगरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्यामुळे महापालिकेतला हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
मित्र पक्षांना सोबत ठेवण्याचा महत्वाचा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महापालिकेत राष्ट्रवादीला अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप केला. निधी वाटपात न्याय देण्याची मागणी केली. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर आणि प्रभागांवर अन्याय केला जातो असं सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेतृत्वाला मित्र पक्षांना सोबत ठेवण्याचा महत्वाचा सल्ला दिला आहे.
Leave a Reply