• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai News : धावत्या ट्रेनमध्ये रक्तरंजित खेळ… मुसळधार पावसात फर्स्टक्लासच्या डब्यात काय घडलं ? प्रवाशाला भोसकणारा तो..

June 24, 2026 by admin Leave a Comment


मुंबईकरांची लाईफलाइन असणारी लोकल.. अविरत धावणारी लोकल.. हजारो, लाखो लोकं रोजच्या रोज या लोकलमधून काम, ऑफीस, शाळा, कॉलेजसाठी प्रवास करत असतात. पण याच लोकलमध्ये मंगळवारी, 23 जूनच्यारात्री असं काही घडलं की त्यातून प्रवास करणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण झाली. पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये असा रक्तरंजित प्रकार घडला, ज्याने सगळेच हादरले. अख्ख्या मुंबईत या प्रकाराची चर्चा ुरू असून आता लोकल प्रवास तरी सुखरूप, सुरक्षित आहे की नाही असा सवाल निर्माण होतोय.

मंगळवार, रात्री मुंबई लोकलमध्ये हादरवून टाकणारी घटना घडल्याचे समोर आले. पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या झालेल्या वादातून, एका तरूणाला चाकू मारून त्याची हत्या करण्यात आली आहे. 23 जूनच्या रात्री चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलमध्ये ही अतिशय बयानक घटना घडली. लोकलच्या डब्याताच, तो तरूण रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि ते पाहताच अनेकांनी भीतीने, दहशतीने डोळेच मिटले.

नेमकं काय घडलं ?

पश्चिम रेल्वे मार्गावर, लोकल ट्रेन क्रमांक 90663 मध्ये अंधेरी ते बोरिवली दरम्यान हा हल्ला झाला. मृत तरुणाचे नाव मयंक लोहार असे असून तो अवघ्या 22 वर्षांचा होता. मंगळवारी रात्री तो फर्स्टक्लासच्या डब्यातून प्रवास करत होता, मात्र तेवहाच अतिशय जोरात पाऊस पडत होता. मुसळधार पावसादरम्यान कोचचा दरवाजा बंद करण्यावरून मयंक आणि आरोपी यांच्यात जोरदार वाद झाला होता.

हळूहळू तो वाद वाढला आणि पाहता पाहता त्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात, त्याच्या बॅगमधून चाकू काढला आणि मयंक याच्या पोटात वार केला. या हल्ल्यात मयंक लोहार हा तरूण गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोल्यात खाली कोसळला. ते पाहून इतर प्रवाशांचा भीतीने थरकाप उडाला.

बोरिवली स्थानकात आरोपी झाला पसार

रात्री 11 वाजून 4 मिनिटांनी ही लोकल बोरिवली स्थानकात पोहोचली होती. पोलिसांना आणि डॉक्टरांना याबाबत कळवण्यात आलं. अखेर 11 वाजून 22 मिनिटांनी डॉक्टरांनी मयंक यांना तपासलं आणि मृत घोषित केले. मात्र ही ट्रेन रिवली स्थानकातील फलाट क्रमांक 6 वर पूर्णपणे थांबण्यापूर्वीच आरोपी ट्रेनमधून उतरला आणि तो पसार झाला. त्याने तिथून पळ काढला,

या धक्कादायक घटनेनंतर पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या बोरिवली जीआरपी पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेने सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तात्काळ ताब्यात घेऊन तपास यंत्रणांकडे सुपूर्द केले आहेत. वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसला असून त्याआधारे त्याचा शोध घेतला जात आहे.

यापूर्वीही लोकलमध्ये घडली होती अशीच घटना

काही महिन्यांपूर्वीच मुंबईत असाच आणखी एक प्रकार घडला होता. जानेवारी महिन्यात मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकावर एका कॉलेज प्रोफेसरची निर्घृण हत्या करण्यात आली. अलोक कुमार सिंह असे या प्राध्यापकाचे नाव होते. लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून एका सहप्रवाशाने त्यांच्या पोटात धारदार चाकूने सपासप वार केले. आरोपीने मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर हा जीवघेणा हल्ला केला.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन, म्हणाले…
  • Ketan Agarwal Murder Case : पळून जाऊन सियाशी लग्न का केलं नाही? केतनला मारलंच का? चेतनचं उत्तर ऐकून सर्वच हादरले…
  • घरात नकारात्मकतेचं वातावरण! वास्तुदोष दूर करण्यासाठी लिंबाचा उत्तम उपाय
  • ‘देऊळ बंद 2’ने ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडू नये; प्रवीण तरडेंची इच्छा, रितेश देशमुखबद्दल म्हणाले..
  • Ketan Murder Case: केतनच्या हत्येसाठी राजा रघुवंशी पॅटर्न; सोनम रघुवंशीप्रमाणेच सियाकडून खूनाची प्लॅनिंग… मर्डर पॅटर्नने हादरले पोलीस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in