• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Mayor bunglow : महापौर बंगल्याच्या टेंडरवरुन वाद, रितू तावडेंच्या निर्णयावर किशोरी पेडणेकरांची जळजळीत प्रतिक्रिया ,’तुमची बालबुद्धी दिसते’

August 5, 2026 by admin Leave a Comment


मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. महापौर बंगल्याच्या कामासाठी 2 कोटी 89 लाखाचं टेंडर काढण्यात आल्याची चर्चा होती. त्यावर आता मुंबई महापालिकेचं वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे महापौरांनी आदेश दिले आहेत. महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. “हे काम राणीच्या बागेचं होतं. पण महापौर बंगल्याचा चुकून यामध्ये उल्लेख झाला. या सगळ्यामुळे हे टेंडर मागे घेण्याचे आदेश मी दिलेले आहेत” असं महापौर रितू तावडे यांनी सांगितलं. टेंडरवर जे शीर्षक होतं, त्यावरुनच हा सर्व वाद निर्माण झाला. महापौरांना सतत प्रश्न विचारले जात होते. अपग्रेडेशन ऑफ हेरिटेज बंगलो असं त्या टेंडरचं शीर्षक होतं. त्यामुळे हे काम महापौर बंगल्याचं की, राणीच्या बागेचं हे स्पष्ट होतं नव्हतं. वारंवार प्रश्न विचारल्यानंतर महापौरांनी चूक मान्य केली. साऊंड बॅरियर लावले जाणार होते. “हे सगळं काम राणीच्या बागेचं होतं. पण महापौर बंगल्याचा संबंध जोडून फेक नरेटिव पसरवण्यात आलं” असं रितू तावडे म्हणाल्या.

“विरोधकांकडे कुठलेही मुद्दे राहिलेले नाहीत. किशोरी पेडणेकरांना रात्रंदिवस महापौरचं दिसतात. आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्वीट केलं. त्यांनी अभ्यास करून स्टेटमेंट करायला हवं होत. आदित्य ठाकरे यांच्या बुद्धीची सुद्धा कीव येते. यांनी जो 25 वर्ष घोटाळा केलाय तो बाजूला करण्याचा काम आम्ही करतोय” असं रितू तावडे म्हणाल्या. “एक फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय की महापौर बंगल्यासाठी आणखी खर्च केला जातोय. महापौर बंगला हेरिटेजकडे येतो. ही टेंडर प्रोसेस बंगल्याच्या अख्त्यारीत येत नाही. महापौर नाव जोडलं की मायलेज त्यांना मिळतो. आपली दुकानं उबाठा पक्ष चालवतोय. 2 कोटी 89 लाखाचा टेंडर काढलाय ते राणी बाग झू उद्यान विभागाकडून टेंडर काढलाय. हेरिटेज कडून काढलेला नाही” असं रितू तावडे म्हणाल्या.

महापौरांना अडचणीत कोण आणतय?

“टेंडर मी ही वाचतेय हेरिटेज बंगलो असं लिहलंय. त्या बंगल्याजवळ अनेक बांधकामं झाली आहेत. अधिकारी अशा चुका कशा करू शकतात? महापौरांना अडचणीत कोण आणतय?. महापौर बंगल्याच्या जवळ बॅरिकेड लावण्यात येतात, तर महापौर बंगल्यापासून किती तरी अंतरावर प्राणी आहेत तरी बॅरिकेडची संकल्पना चांगली आहे. टेंडर मागे घेण्यावरून तुमची बालबुद्धी दिसते” अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
  • Horoscope Today : चार राशींचे नशीब फळफळणार, करिअर, पैशांबाबत मोठी खुशखबर येणार; काय घडणार?
  • Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in