• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mulshi Pattern 2: मुळशीची बदनामी करून मोठे झाले, पैसा कमावला..; प्रवीण तरडेंवर मुळशीकरांचा आरोप, ‘मुळशी पॅटर्न 2’च्या नावाला विरोध

August 26, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या आगामी ‘मुळशी पॅटर्न 2’ या चित्रपटाच्या नावावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या नावामुळे मुळशी तालुक्याची बदनामी होत असल्याचा आरोप करत मुळशीतील स्थानिक नागरिकांनी चित्रपटाच्या नावाला विरोध केला आहे.

अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या आगामी ‘मुळशी पॅटर्न 2’ या चित्रपटाच्या नावावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या नावामुळे मुळशी तालुक्याची बदनामी होत असल्याचा आरोप करत मुळशीतील स्थानिक नागरिकांनी चित्रपटाच्या नावाला विरोध केला आहे.

यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत ‘मुळशी बचाव समिती’ स्थापन केली असून चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुळशीकरांच्या मते पहिल्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटामुळे मुळशी तालुक्याचं नाव देशभर पोहोचलं. मात्र या प्रसिद्धीसोबत तालुक्याची ओळख गुन्हेगारीशी जोडली गेल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत ‘मुळशी बचाव समिती’ स्थापन केली असून, चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुळशीकरांच्या मते, पहिल्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटामुळे मुळशी तालुक्याचं नाव देशभर पोहोचलं. मात्र, या प्रसिद्धीसोबत तालुक्याची ओळख गुन्हेगारीशी जोडली गेल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

चित्रपटामुळे मुळशी म्हणजे गुन्हेगारी गुंडगिरी आणि गुन्हेगारांचा तालुका अशी प्रतिमा निर्माण होत असल्याचा दावा समितीतील सदस्यांनी केला. या प्रतिमेचा परिणाम तालुक्यातील उद्योग व्यवसाय तसंच स्थानिक युवकांच्या नोकरीच्या संधींवर होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर युवक-युवतींच्या विवाहाच्या बाबतीतही मुळशीच्या या प्रतिमेमुळे अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चित्रपटामुळे मुळशी म्हणजे गुन्हेगारी, गुंडगिरी आणि गुन्हेगारांचा तालुका अशी प्रतिमा निर्माण होत असल्याचा दावा समितीतील सदस्यांनी केला. या प्रतिमेचा परिणाम तालुक्यातील उद्योग, व्यवसाय तसंच स्थानिक युवकांच्या नोकरीच्या संधींवर होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर युवक-युवतींच्या विवाहाच्या बाबतीतही मुळशीच्या या प्रतिमेमुळे अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या नावाला विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुळशी बचाव समितीची पहिली बैठक पौड गावात पार पडली. त्यानंतर आता तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला जात आहे. ‘मुळशी’ हे नाव चित्रपटासाठी वापरू नये यासाठी गावागावात ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या नावाला विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुळशी बचाव समितीची पहिली बैठक पौड गावात पार पडली. त्यानंतर आता तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला जात आहे. ‘मुळशी’ हे नाव चित्रपटासाठी वापरू नये, यासाठी गावागावात ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे प्रवीण तरडे हे स्वतः मुळशीचे असल्याने समिती त्यांच्या भेटीसाठी जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. उलट त्यांनीच मुळशीकरांकडे यावं आणि चित्रपटाचं नाव बदलण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे प्रवीण तरडे हे स्वतः मुळशीचे असल्याने समिती त्यांच्या भेटीसाठी जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. उलट त्यांनीच मुळशीकरांकडे यावं आणि चित्रपटाचं नाव बदलण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.

समितीतील काही सदस्यांनी प्रवीण तरडे यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. प्रवीण तरडे स्वतः मुळशीचे असूनही मुळशीची बदनामी करून मोठे झाले आणि त्यातून पैसा कमावत आहेत असा आरोप काही सदस्यांनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळात वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

समितीतील काही सदस्यांनी प्रवीण तरडे यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. “प्रवीण तरडे स्वतः मुळशीचे असूनही मुळशीची बदनामी करून मोठे झाले आणि त्यातून पैसा कमावत आहेत,” असा आरोप काही सदस्यांनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळात वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या
  • अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
  • Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in