• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!

August 26, 2026 by admin Leave a Comment


नेपाळमध्ये महापूराने विध्वंस झाला आहे. होत्याचे नव्हते झाले आहे. आज सकाळी, जवळपास 9 वाजता उत्तर नेपाळमधील रसुवा या जिल्ह्याला महापूराचा फटका बसला. भोटेकाशी नदीने तिच्या सीमा विस्तारल्या. अचानक पूराचे पाणी अनेक शहरांत, गावात घुसले. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की गावाची गावं नेस्तनाबूत झाली. बाजार गायब झाले. पूल वाहून गेलंत. इमारती पत्त्यांप्रमाणे गडगडल्या. काही व्हिडिओ अत्यंत धडकी भरवणारे आहे. अनेकांच्या काळजाचा त्यामुळे थरकाप उडाला आहे.

This is seriously scary. CCTV footage from Gyirong Port in Tibet, China, directly opposite Nepal’s Rasuwa district. This flash flood hit here first and later caused massive havoc in Nepal. Can’t even imagine someone surviving this. Prayers for everyone affected. 🙏 https://t.co/o805P8KGSu pic.twitter.com/31QzZ64aBD

— Nikhil saini (@iNikhilsaini) August 26, 2026

अनेक जण गायब

रसुवा हे जवळपास 50 हजार लोकसंख्या असलेले शहर आहे. सर्वाधिक फटका चीन-नेपाळ सीमावर्ती भागाला बसला आहे. जिल्हाधिकारी नरेंद्र परियार यांनी गाव आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट साईट्सला सर्वाधिक फटका बसल्याचे म्हटले आहे. अनेक पूल वाहून गेल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत किती जण गायब झालेत. किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर आली नसल्याचे ते म्हणाले. पण मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.

#BREAKING

105 Indian tourists missing and nearly 400 Kailash Mansarovar pilgrims, mostly Indians, are out of contact after a massive flash flood struck the China-Nepal border region

Terrifying CCTV footage from an immigration office on the Chinese side of the Rasuwagadhi border… pic.twitter.com/ToIiaSCKWl

— Nabila Jamal (@nabilajamal_) August 26, 2026

मुख्य कारण आले समोर

आतापर्यंत मुसळधार पावसाने हा विध्वंस झाल्याचे मानले जात होते. पण नेपाळच्या हवामान अंदाजानुसार, रसुवामध्ये गेल्या 24 तासात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला आहे. 7 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेला नाही. भोटेकाशी नदीच्या वरच्या पट्ट्यात तिबेटमध्ये मोठे काही घडल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे. त्यानुसार एक बर्फाच्छादीत तलाव फुटल्यानेच या भागाला महापूराचा फटका बसल्याचा दावा करण्यात आला आहे.

बातमी अपडेट होत आहे…





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in