• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..

August 26, 2026 by admin Leave a Comment


छत्रपती संभाजी नगरच्या खवड्या डोंगरावर गेल्या आठवड्यात शुक्रवारी भयानक घटना घडली. तेथे कुणाल चांदगुडे याने आयुष्य संपवलं, त्याच्यापाठोपाठ वडिलांचाही जोंगरावर पडून मृत्यू झाला. पोटत मुलगा आणि आपला पती दोघेही गेल्याचे दिसताच कुणालची आई संगीता यांनीही निनिषार्धात त्याच डोंगरावरून उडी मारून जीव दिला. एकाच कुटुंबातील तिघांचा गेलेला हा बळी प्रचंड हादरवणारा असून गेल्या काहि दिवसांपासून संपूर्ण राज्यात याच गोष्टीची चर्चा होत आहे. चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूनंतर विविध तर्क-वितर्क व्यक्त होत असून विविध दावेही केले जात आहे. कुणालच्या आयफोनच्या हट्टापायी ही हादरवणारी घटना घडल्याचं अनेकांकडून बोललं गेलं, मात्र त्यांच्या कुटुंबियांनी हे सर्व दावे फेटाळू लावले होते.

कुणालला आत्महत्या करायचीच नव्हती, असं त्याच्या मावशीने नुकतंच म्हटलं होतं, . त्यानंतर आता कुणालच्या मावस बहिणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिने कुणालबाबत पसरवल्या जाणाऱ्या विविध दाव्यांवर स्पष्टीकरण देत, “तो तसला मुलगा नव्हता,” असं स्पष्ट केलं. तसेच कुणालने ज्या गोष्टी केल्याच नाहीत, त्यावरून त्याची बदनामी केली जात असल्याचं म्हणत चुकीच्या बातम्या पसरवू नका, अशी भावनिक विनंती तिने केली आहे.

कुणाल तसला मुलगा नव्हता; बहिणीचं काळीज पिळवटून टाकणारं आवाहन

“माझा भाऊ कुणाल, संगीता मावशी आणि मुरली काका आता या जगात नाहीत. मात्र, त्यांच्यावर केले जाणारे काही खोटे आणि घाणेरडे आरोप आम्हाला आता सहन होत नाहीत. त्यामुळेच मी हा व्हिडीओ करत आहे. कुणाल तसला मुलगा नव्हता,” असं कुणालच्या मावस बहिणीने म्हटलं.

कुणालने वावराच्या वाटणीच्या वादातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा केला जात असल्याचा उल्लेखही तिने केला. मात्र, तिच्या म्हणण्यानुसार, कुणालला लहानपणापासूनच त्याच्या आई-वडिलांनी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती.

आयफोनसाठी किंवा पैशांसाठी त्याने हे केलं नाही

कुणालने आयफोनसाठी किंवा घरच्यांकडून पैसे हवे असल्याने हे सगळं केल्याच्या चर्चांनाही तिने फेटाळून लावलं. “अजूनही खोटी बातमी पसरवली जात आहे की त्याने हे सगळं आयफोनसाठी केलं किंवा त्याला घरच्यांकडून पैसे हवे होते. असं खरंच काहीही नाही. मी खोटं सांगत नाही. त्याच्याकडे आयफोन 15 प्रो होता. त्याला पैशांची कधीच गरज पडली नाही,” असं तिने स्पष्ट केलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by akshuu𓆩♡𓆪 (@aksharavibez)

वावराच्या वाटणीच्या मुद्द्यावर बोलताना कुणालच्या बहिणीने सांगितलं की, कुणालला केवळ त्याचे वडील पुन्हा पूर्वीसारखे हवे होते. तिच्या म्हणण्यानुसार, मागील अनेक वर्षांपासून कुणालच्या वडिलांपासून दूर असलेली त्यांची बहीण अचानक त्यांच्या जवळ येत असल्याचं कुणाल आणि त्याच्या आईला जाणवलं. ही गोष्ट त्यांना खटकली असावी, असं तिने सांगितलं.

“कुणालला फक्त त्याचे वडील परत पाहिजे होते. त्याला त्याचे वडील तिकडे नको होते. माझ्या काकांचा स्वभाव एकदम निर्मळ होता. कोणी त्यांच्याशी चांगलं बोललं, गोड शब्द बोलले, तर ते त्या व्यक्तीसाठी जीवसुद्धा द्यायला तयार व्हायचे,” असंही कुणालच्या बहिणीने सांगितलं. दरम्यान, या घटनेनंतर कुणालच्या मृत्यूमागील कारणांबाबत विविध दावे केले जात आहेत. मात्र, कुटुंबीयांनी केलेल्या या दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे कुणालबाबत चुकीची किंवा अपुष्ट माहिती पसरवू नये, अशी कुटुंबीयांची विनंती आहे.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in