• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच… हे काय घडलं?

July 28, 2026 by admin Leave a Comment


एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करत पेपर सेट करणाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा केला आहे. तसेच 12 लाख रुपयांत पेपरची विक्री झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे.

रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यानुसार, या प्रकरणात कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्यावर पेपरफुटीचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले होते.
अशात आता अचानक तक्रारदार लकी पाटील आणि कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील हे सकाळपासून संपर्काबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे या प्रकरणावरील चर्चांना आणखी वेग आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावे, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. मात्र, आरोपांची अधिकृत चौकशी पूर्ण होईपर्यंत या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. तसेच महाराष्ट्र लोक सेवा आयोगातील वरिष्ठांनीही कोणताही गैरप्रकार घडला नसेल असं सांगत पारदर्श तपास करण्याची तयारी दाखवली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
  • मोठी बातमी! लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार? वन नेशन वन इलेक्शनबाबत मोठी अपडेट!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in