• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Monsoon Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील 24 तासात..

June 23, 2026 by admin Leave a Comment


अरबी समुद्रात 15 दिवसांपासून रेंगाळलेल्या मॉन्सूनने पुढे वाटचाल केलीये. मागील 15 दिवसांपासून एकाच ठिकाणी मॉन्सून रेंगाळत होता. अखेर त्याने पुढे वाटचाल केली. मॉन्सून पुणे, लातूर, धाराशिव, आलिबागपर्यंत पोहोचला आहे. मुंबईसह राज्यात जवळपास जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत मॉन्सून पूर्णपणे दाखल होईल. 4 जून रोजीच मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर 8 जूनपर्यंत तळ कोकणात पोहोचला होता. मात्र, पुढे त्याची वाटचाल पूर्णपणे थांबली होती. तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा, गया, सुंदरगड, झारखंड, मुझफ्परपूर, पुणे, निजामाबाद, आलिबागपर्यंत मॉन्सून प्रगती केली. 15 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मॉन्सून पुढे वाटचाल करत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पेरण्या रखडल्या होत्या. अखेर शेतकरी पेरण्या करू शकतात. कोकणात आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने विदर्भात जारी केला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आणि सिंधुदुर्ग भागात आज पावसाची शक्यता आहे. मुंंबईसह काही भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. मुंबईत पावसाला सुरूवात झाली. आज पुण्यातही पावसाचा इशारा देण्यात आला.

राज्यात मॉन्सून उशीरा दाखल झाला. उशीरा देखील दाखल झाला असला तरीही मॉन्सूनच्या पावसासाठी पोषक वातावरण आहे. धुळे शिरपूर शहरासह साक्री, शिंदखेडा तालुक्यात विविध ठिकाणी वारासह पावसाला सुरुवात. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मिळणार मोठा दिलासा. उघड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना देखील अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मिळाला उकाडापासून काहीसा दिलासा मिळाला. या पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण.

लासलगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह 20 मिनिटे जोरदार पाऊस. उकाड्याने हैराण नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मिळाला दिलासा. आणखी दोन ते तीन मोठ्या पावसांची शेतकऱ्यांना पेरणीसाठी अपेक्षा. राज्यातील जवळपास सर्वच भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. पुढील काही दिवस पाऊस कायम राहणार आहे. आज धो धो पाऊस कोसळताना दिसेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Floods : नेपाळमधल्या विनाशाला चीन जबाबदार का? ऐनवेळी रियल टाइम डाटा का नाही शेअर केला?
  • Nepal Flood : मातीचा विशाल प्रवाह घरात शिरला, मी पत्नीचा हात पकडला पण… डोळ्यात पाणी आणणारी नेपाळमधील व्यक्तीची कहाणी
  • मुंबई एअरपोर्टवरुन विमान प्रवास करणार असाल तर आधी चेक करा, कारण 1 ऑक्टोबरपासून विमानतळाच लोकेशन बदलणार
  • Nepal Flood : नेपाळच्या जलप्रलयात महाराष्ट्रातील किती जण बेपत्ता? एकूण भारतीय पर्यटकांचा आकडा आला समोर
  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in