• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकेकाळी दीपिका पादुकोणसाठी दरवाजा खोलायची माजी मुख्यमंत्र्यांची नात, आज आलिया भट्टला देतेय टक्कर

June 23, 2026 by admin Leave a Comment


सर्वांना वाटतं अभिनेता आणि अभिनेत्री होणं फार सोपं आहे. पण दिसणारी प्रत्येक गोष्ट सहज मिळते असं नाही. बॉलिवूडचं देखील असंच काही आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची नवी आणि भक्कम ओळख निर्माण करणं फार कठीण आहे. विशेषतः जेव्हा, तेव्हा तुमचं कुटुंब बॉलिवूडचं नाही. बाहेरुन येणाऱ्या कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यातही कधी नशीब चमकेलं याची कोणतीच गॅरेंटी नाही. असचं काही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीसोबत झालं आहे. कधीकाळी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासाठी दरवाजा खोलणारी मुलगी आज अभिनेत्री आलिया भट्ट हिला टक्कर देत आहे. बॉलिवूडमध्ये तिने अव्वल अभिनेत्रीच्या यादीत आता स्थान मिळवलं आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून, राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ आहे. पण हा प्रवास शर्वरी हिच्यासाठी काही सोपा नव्हता. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापू्र्वी शर्वरी हिने ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं..

सिनेमातील ‘दीवानी मस्तानी’ या प्रसिद्ध गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान, दीपिका पदुकोणने साकारलेल्या ‘मस्तानी’च्या प्रवेशासाठी सेटवरील भव्य दरवाजे उघडण्याची जबाबदारी ज्या सहाय्यक कलाकारांवर सोपवण्यात आली होती, त्यापैकी शर्वरी एक होती. शर्वरीने स्वतः एका मुलाखतीत ही माहिती दिली.

सिनेविश्वात पदार्पण करण्यापूर्वी शर्वरी हिने 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द फॉरगॉटन आर्मी – आजादी के लिए’ या वेब सीरिजमधून करियची सुरुवात केली. पण तिला 2024 साली प्रदर्शित झालेल्या ‘मुंज्या’ सिनेमातून ओळख मिळाली. त्यानंतर शर्वरी हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज शर्वरी हिला कोणत्याच ओळखीची गरज नसते.

शर्वरी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘बंटी और बबली 2’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता शर्वरी एका दमदार सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे, सिनेमात शर्वरी अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.. सिनेमाचं नाव आहे ‘अल्फा’, सिनेमा 10 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, सिनेमात अभिनेता बॉबी देओल याची मुख्य भूमिका आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई एअरपोर्टवरुन विमान प्रवास करणार असाल तर आधी चेक करा, कारण 1 ऑक्टोबरपासून विमानतळाच लोकेशन बदलणार
  • Nepal Flood : नेपाळच्या जलप्रलयात महाराष्ट्रातील किती जण बेपत्ता? एकूण भारतीय पर्यटकांचा आकडा आला समोर
  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान
  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in