• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, थेट..

June 23, 2026 by admin Leave a Comment


खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदार संघात येत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आणि मगच निर्णय घेतला. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसचा निकाल पुढे आला. ज्यानंतर ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यात आली. ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार नसल्याच्याही चर्चा सुरू होत्या. ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते मध्यरात्री ओमराजे निंबाळकर यांना भेटण्यासाठी दाखल झाले. त्यांची मनधरणी करण्यात आली. मात्र, त्यानंतरही ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून अखेर एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. ओमराजे निंबाळकर यांच्या या निर्णयानंतर धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले. यादरम्यानच ठाकरेंच्या शिवसेनेने मोठा निर्णय घेतला.

ओमराजे निंबाळकरांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेची पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले. 26 जूनच्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे आयोजन करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या संघटनात्मक पुनर्बांधणीला वेग आला आहे. 26 जून रोजी उद्धव ठाकरे यांचा धाराशिव दौरा नियोजित असून त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाभरात पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी राजकीय रणनीती ठरवण्यासाठी पुढील दोन दिवस विविध तालुक्यांमध्ये ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. या बैठकींमध्ये संघटनात्मक फेरबांधणी, नवीन जबाबदाऱ्या तसेच उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी दिली आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली असून ठाकरे शिवसेना पुन्हा ताकद उभी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या 26 तारखेच्या धाराशिव दाैऱ्याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. दुसरीकडे ओमराजे निंबाळकर हे देखील नेहमीप्रमाणेच सक्रिय झालेत. आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्यांच्याकडूनही प्रयत्न केली जात आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार
  • ओमराजे निंबाळकर यांनी अगोदर माफी मागावी… ती पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ, थेट मुलानेच..
  • ‘देऊळ बंद 2’चा नवा विक्रम; ‘दशावतार’लाही दिली टक्कर, कमावला 152% अधिक नफा
  • मातोश्रीसमोर अजून मोठं आव्हान… एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन… कलानगरच नाही दादरमध्ये मोठी शोधाशोध
  • Mumbai Weather : मुंबईत धो धो पाऊस, मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in