• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वस्ताद… हिंदू गब्बर! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राणेंचा बॅनर… नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर बॅनरबाजी; खासदार फुटीनंतर डिवचले

June 23, 2026 by admin Leave a Comment


मयुरेश जाधव, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: सहा खासदारांनी काल शिंदे सेनेत अधिकृत प्रवेश केला. गेल्या चार वर्षातील शिंदे सेनेला हा दुसरा मोठा धक्का आहे. उद्धव सेनेला आता भाजप आणि शिंदे सेनेतून डिवचण्यात येत आहे. मातोश्री बाहेर मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागले आहेत. बॅनर वर हिंदू गब्बर असा उल्लेख करण्यात आला आहे. खासदार फुटीनंतर आणि वाढदिवसाच्या निमित्ताने राणे समर्थकांनी उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर मातोश्री (Nitesh Rane Banner opposite Matoshri) बाहेर लावले आहे. मयूर बागोरिया यांच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनवर भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो आहेत.

हिंदू गब्बरच्या बॅनरची पुन्हा चर्चा

मुंबईतील कलानगर परिसरात मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा हिंदू गब्बर असा उल्लेख करण्यात आलेला आहे. खासदार फुटीनंतर आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्री बाहेर लावण्यात आलेल्या या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. या बॅनरमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सध्या खासदार फुटीने ठाकरे सेनेत अस्वस्थता आहे. तर ऑपरेश टायगरमध्ये येत्या काही दिवसात आमदार आणि मुंबईतील नगरसेवक येण्याचा दावा शिंदे सेना करत असल्याने डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे आता सहाही खासदारांच्या मतदारसंघात तळ ठोकणार आहेत. तिथल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. त्यात चार आमदारांनी दांडी मारल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यात राणे समर्थकांच्या या बॅनरमुळे ठाकरे आणि राणे यांच्यातील कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांचा आज 23 जून रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने राणे समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बाहेर बॅनर लावले आहेत. नितेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नितेश राणे यांचा उल्लेख ‘वस्ताद’ आणि ‘हिंदू गब्बर’ असा करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सुद्धा अशीच प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली होती. पण यावेळी खासदार फुटीचे अजून एक निमित्त मिळाले आहे. तर त्यापूर्वीच्या बॅनरवर नितेश राणे यांचा ‘हिंदूरक्षक’ असा उल्लेख करण्यात आला होता. हे बॅनर लक्षवेधी ठरले आहे.

किरण पावसकर यांच्या विधानाने संताप

काल सहा खासदारांनी अधिकृतपणे शिंदे सेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाच्या मंचावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले किरण पावसकर यांच्या एका वक्तव्याने वाद पेटला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या वक्तव्याचा आधार घेत मुलाला आणि नातवाला सांभाळायला हे काय पाळणाघर आहे का? असे जहरी वक्तव्य पावसरकर यांनी केले. बाळासाहेबांच्या अखेरच्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत अशा आशयाचे जनतेला आवाहन केले होते. तो धागा पकडून ही खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात येत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जीआर आला, 3000 मिळणार की 1500, मोठी अपडेट समोर!
  • राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in