• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Meenakshi Sheshadri : हिंसाचाराला परवानगी पण सनी देओलसोबतच्या माझ्या Kissing सीनवर..मीनाक्षी शेषाद्रींनी जे चुकीचं वाटलं ते बोलून दाखवलं

July 9, 2026 by admin Leave a Comment


सध्या ‘सतलज’ चित्रपटावरुन जो वाद सुरु आहे, त्याने पुन्हा एकदा CBFC म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. सर्टिफिकेशनच्या प्रोसेसमधील सातत्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बऱ्याच संघर्षानंतर दिलजीत दोसांझचा ‘सतलज’ चित्रपट OTT वर रिलीज झाला. पण अवघ्या दोन दिवसात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आला. ‘सतलज’ चित्रपटाला ज्या अडचणीचा सामना करावा लागला, त्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांनी अलीकडेच चार दशकापूर्वीचा आपला अनुभव शेअर केला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल आणि सनी देओल सोबतचा अनुभव मिनाक्षी शेषाद्री यांनी शेअर केला. ‘बेताब’मधून सनी देओल सोबत डेब्यू होणार होता, त्यावर सुद्धा मिनाक्षी शेषाद्री बोलल्या.

“फार लोकांना माहित नाहीय, मी ‘बेताब’साठी स्क्रीन टेस्ट दिली होती. धरमजींना मला संधी द्यायची होती. ते एकदा मला बोलले की, मी तुला कास्ट केलं नाही, त्यानंतर तू मनोज कुमार आणि सुभाष घई यांच्यासोबत काम केलं. ‘हिरो’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला” अशी आठवण मिनाक्षी शेषाद्री यांनी सांगितली. “मी एक दिवस तुला कास्ट करेन. घायल रिलीज झाला. त्यावेळी मी त्यांच्या होम प्रोडक्शनसाठी काम केलं. त्यामुळे मला सनी सोबत काम करण्याची संधी मिळाली. धरमजी आणि हेमाजींसारखी माझी आणि सनीची जोडी पसंत केली. घायल, डकैत आणि घातक मधील आमच्या कामाचं लोकांनी कौतुक केलं” असं मिनाक्षी शेषाद्री मुलाखतीत म्हणाल्या.

डकैत’ एक पावरफुल चित्रपट होता

1987 साली आलेल्या ‘डकैत’ चित्रपटाबद्दलचा सेन्सॉर बोर्डाचा अनुभव मिनाक्षी शेषाद्री यांनी मुलाखतीत सांगितलं. “सेन्सॉर बोर्डाने आमच्या किसींग सीनवर आक्षेप घेतला. पण चित्रपटातला हिंसक कंटेट तसाच होता. ‘डकैत’ एक पावरफुल चित्रपट होता. सेन्सॉरकडून हा चित्रपट मंजूर करुन घेण्यासाठी राहुल रवैल यांनी काय केलं हे तुम्हाला माहित आहे का?. एक गाणं होतं, त्यात माझा आणि सनीचा लिपलॉक सीन होता. तुम्ही तो सीन पाहिला का? सेन्सॉर बोर्डाने म्हटलं की, आम्ही हिंसाचाराच्या दृश्यांना परवानगी देऊ पण किसींग सीन काढावा लागेल” असं मीनाक्षी शेषाद्री म्हणाल्या. सतलजच्या विषयावरुन सेन्सॉर बोर्डावर टीका होत आहे. त्यामुळे मिनाक्षी शेषाद्री यांचा इंटरव्यू चर्चेत आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in