• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मध्यरात्री डॉक्टरांची धावाधाव, उपोषणस्थळी काय घडलं? महत्वाची अपडेट समोर

September 1, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील 4 दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी देखील कमी झाली आहे. त्यांना उपचाराची नितांत गरज असताना मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने उपचार नाकारले जात आहेत. उपोषणस्थळी रात्री दोन वेळा वैद्यकीय पथक येऊनही त्यांनी उपचार नाकारले. त्यात मनोज जरांगेंची प्रकृती चौथ्या दिवशी खालावल्याने त्यांना उपचार देण्याचे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने प्रशासन आणि सरकार समोर सर्वप्रथम त्यांना उपचार देण्याचं आव्हान आहे. खरंतर जरांगे हे उपचारासह तपासणी करण्यास देखील नकार देत आहेत. उपोषणस्थळावर रात्री दोन वेळा वैद्यकीय पथक आले, उपचार नाकारल्याने परत गेले.

उपोषणस्थळी मध्यरात्री नेमकं काय घडलं?

मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत, यासाठी वैद्यकीय पथकाने दोन वेळा धावाधाव केली. परंतु जरांगेंनी उपचार नाकारल्याने वैद्यकीय पथकाला निराशा हाती आली. पहिल्यांदा आरोग्य विभागाचे पथक आले तसे परत गेले. दुसऱ्यांदा रात्री 1.15 वाजता बराचवेळ डॉक्टरांनी तपासणीसाठी प्रयत्न केले. मात्र दुसऱ्यांदा देखील पथकाला तपासणी न करता परत जावे लागले. बीपी आणि शुगर कमी झाली असून उपचाराची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितले. त्यांना नितांत उपचाराची आवश्यकता असल्याचा अहावाल वरिष्ठांकडे देण्यात आलाय. दुसरीकडे जरांगे हे तपासणीसाठी सुद्धा नकार देत आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

उपोषणस्थळी जालन्याचे जिल्हाधिकारी

जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी दाखल झाल्या. त्यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या, ‘आम्ही त्यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली. परंतु त्यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. त्यांनी उपचाराला नकार दिला असून आम्ही डॉक्टरांशी त्यासंदर्भात बोललो आहोत’.

प्रसाद लाड आज अंतरवाली सराटीत येणार

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असून आज दुपारपर्यंत आमदार प्रसाद लाड भेट घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या मागण्यांबाबतीत काही तोडगा निघाला की नाही हे भेटीदरम्यान स्पष्ट होईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood: एका साडीने वाचवले 21 लोकांचे प्राण, नेपाळच्या महापूरात कशी ठरली ‘देवदूत’?
  • धक्कादायक… SIRच्या प्रारुप मतदार यादीतून मुंबईतील 36 लाख नावे वगळली; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
  • Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरची आत्महत्या; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
  • Badshah And Isha Rikhi Divorce: 5 महिन्यात बादशाहचा दुसरा संसार मोडला, पोटगी म्हणून किती रुपये दिले?
  • Electricity bill of Antilia: मुकेश अंबानींच्या अँटिलियामध्ये दर महिन्याला किती वीज वापरली जाते, बिल किती येते?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in