• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra Weather Updates : मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा मोठा इशारा

July 18, 2026 by admin Leave a Comment


जुलै महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले तरीही राज्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने आतापुन्हा कमबॅक करण्यास सुरूवात केली आहे. राज्याच्या अनेक भागात पाऊस अजून पोहोचला नसला तरी आज बहुतांश भागात मुसळधार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. दरम्यान मुंबई-कोकण वगळता आज उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी आज जोरदार वारा, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सावध राहण्याची सूचनाही जारी करण्यात आली आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. मात्र, मोसमी पावसाला बळ देणाऱ्या प्रमुख हवामान प्रणाली सध्या सक्रिय नसल्याने राज्यभर पावसाचा जोर कमी झाला असून अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील हवामानावर दिसून येत आहे. या प्रणालीमुळे मान्सूनच्या वाऱ्यांना काही प्रमाणात गती मिळाली असून राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शुक्रवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारीही राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळू शकतात.

मुंबईत पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण

मुंबई आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस शहरात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता सध्या कमी असली, तरी अधूनमधून हलक्या सरी आणि ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

कोकण आणि घाट परिसरात पावसाची शक्यता

पुढील 24 तासांत मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, विशेषतः घाटमाथ्याच्या भागात, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भाग तसेच विदर्भातही अधूनमधून हलक्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने आज पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, हिंगोलीत तसेच अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरमध्ये पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोठ्या पावसासाठी अजून प्रतीक्षा

सध्या पावसाला चालना देणाऱ्या प्रमुख हवामान प्रणाली पूर्णपणे सक्रिय नसल्यामुळे राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाची परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काही भागांत पावसाची शक्यता वाढली असली, तरी राज्यभर जोरदार पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तोपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आणि ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat case Update: मोठी अपडेट! अशोक खरात प्रकरणी आज होणार मोठा निर्णय, नेमकं काय घडणार?
  • हा नुसता माज नाही तर… अमेरिकेतला तिरंग्याचा तो व्हिडीओ व्हायरल, भारतीय लोकांमध्ये तीव्र संताप, थेट..
  • Sunny Deol : सनी देओलला मुस्लीम दाखवल्यामुळे ‘बंटवारा 1947’ ला मोठा फटका? दिग्दर्शकाने सोडलं मौन
  • Abhijeet Dipke: BJP ला वाटतं की ते RSS पेक्षा मोठं आहेत, मोदी यांनी…अभिजीत दिपके यांचा सरकारवर निशाणा
  • Shivsena | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! मिशन टायगरमधून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in