
मागच्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. आज कुठेही पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली नाही. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वेमार्ग आणि एक्स्प्रेस वे बाधित झाला होता. पावसामुळे राज्यातील विविध धरणांमध्येही पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. बळीराजा सुद्धा सुखावला आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे डोळेही पावसाकडे लागले होते. आठ दिवस पडलेल्या पावसामुळे पुण्यात एक जुलै ते आठ जुलै दरम्यान 270 झाड पडण्याच्या घटना घडल्या. 20 ठिकाण पाणी शिरले आणि साचल्यांच्या घटना, तर 10 ठिकाणी धोकादायक भिंत पडल्याची घटना घडल्या. धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने घट होत असल्याने काल रात्री खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 6296 क्युसेक विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.
Leave a Reply