• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Madhuri Dixit: ‘दयावान’मधल्या वादग्रस्त किसिंग सीनची नुकसानभरपाई म्हणून माधुरी दीक्षितला दिली इतक्या कोटींची ऑफर

September 1, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडच्या इतिहासात काही चित्रपट त्यांच्या कथेमुळे तर चित्रपटातील एखाद्या दृश्यामुळे कायमचे लक्षात राहतात. 1988 मध्ये प्रदर्शित झालेला ‘दयावान’ असाच एक चित्रपट आहे. विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्या अभिनयासोबतच या चित्रपटातील एका इंटिमेट सीनची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती. आजही या सीनचा उल्लेख बॉलिवूडमधील सर्वाधिक वादग्रस्त इंटिमेट सीन्सपैकी एक म्हणून केला जातो. रिपोर्ट्सनुसार, ‘दयावान’च्या शूटिंगवेळी विनोद खन्ना हे 41 वर्षांचे होते, तर माधुरी दीक्षित त्यावेळी नुकतीच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करत होती. दोघांच्या वयात मोठा फरक होता. या चित्रपटातील एका किसिंग सीनसाठी विनोद खन्ना यांनी त्यांचं मानधन कमी करण्यासही तयारी दर्शवली होती.

शूटिंगदरम्यान काय घडलं?

हा सीन ‘आज फिर तुमपे प्यार आया है’ या गाण्याचा भाग होता. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये अशा प्रकारची दृश्ये तुलनेनं दुर्मीळ असल्याने या सीनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या सीनच्या शूटिंगबाबत गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे दावे केले जात आहेत. दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही विनोद खन्ना काही काळ किस करत राहिले आणि या प्रसंगामुळे माधुरी अस्वस्थ झाल्याचं सांगितलं जातं. काही रिपोर्ट्समध्ये त्यांनी माधुरीच्या ओठांना चावा घेतल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यानंतर विनोद खन्ना यांनी माधुरीची माफी मागितल्याचंही वृत्त आहे.

सीन काढून टाकण्याची मागणी

या दृश्यामुळे मोठा वाद निर्माण झाल्यानंतर ते चित्रपटातून हटवण्याचीही मागणी झाली होती. माधुरीनेही हा सीन काढून टाकण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. मात्र, दिग्दर्शक-निर्माते फिरोज खान यांनी तो सीन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर हा सीन कायम ठेवण्यासाठी माधुरीला त्यांनी तब्बल 1 कोटी रुपये दिल्याचीही चर्चा होती.

माधुरी दीक्षितचा पश्चात्ताप

अनेक वर्षांनंतर माधुरी दीक्षितने या प्रसंगाबद्दल बोलताना तो अनुभव तिच्यासाठी अस्वस्थ करणारा असल्याचं सांगितलं. एका मुलाखतीत तिने या घटनेतून आपण काहीतरी शिकलो आणि त्यानंतर अशा प्रकारची दृश्ये न करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. ‘दयावान’मधील हा प्रसंग त्यामुळे केवळ एक बोल्ड सीन म्हणून नव्हे, तर कलाकारांच्या संमती, वैयक्तिक मर्यादा आणि शूटिंगदरम्यानच्या व्यावसायिक सुरक्षिततेबाबत चर्चेत राहिलेला प्रसंग ठरला.

1988 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माधुरी आणि विनोद खन्ना पुन्हा कधीही दुसऱ्या चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. ‘जनसत्ता’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत माधुरीने म्हटलं होतं की, तो विशिष्ट सीन कसा चित्रित केला जाईल याची तिला कल्पना नव्हती आणि तो पडद्यावर पाहताना तिला अजूनही धक्का बसत होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Raqesh Bapat: ‘नवरी मिळे हिटलरला’च्या तुफान यशानंतर राकेश बापटची नवी मालिका; साकारणार ही भूमिका
  • जन्मतःच नवजात मुलाची सलमान सारखी ताकद, स्टाइल बघून डॉक्टर नर्स हैराण…
  • Vaibhav Sooryavanshi: बॉलिंग अ‍ॅक्शन सेम टू सेम असली तरीही तू…वैभवच्या बॉलिंग अ‍ॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट
  • Kalva Hospital : धक्कादायक, कळवा हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या ताटामध्ये झुरळ VIDEO
  • Nepal flood crisis: नेपाळवर नवं संकट! महामारीच सावट… 4000 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in