• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kalva Hospital : धक्कादायक, कळवा हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या ताटामध्ये झुरळ VIDEO

September 1, 2026 by admin Leave a Comment


ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर निष्काळजीपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला देण्यात आलेल्या रात्रीच्या जेवणात चक्क झुरळ आढळल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि पदाधिकाऱ्यांनी हा धक्कादायक प्रकार प्रत्यक्ष उघडकीस आणला असून, यामुळे रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

२८ ऑगस्ट रोजी रात्री रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला जेवणाचे ताट देण्यात आले होते. रुग्ण जेवण घेत असताना ताटातील अन्नामध्ये झुरळ दिसून आले. हा प्रकार समोर येताच वॉर्डातील रुग्णांमध्ये तीव्र संताप उसळला. घटनेची माहिती मिळताच अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ वॉर्डात धाव घेऊन पाहणी केली आणि रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. कळवा रुग्णालयात ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि ग्रामीण भागातून दररोज हजारो सामान्य नागरिक उपचारासाठी दाखल होतात. येथे दररोज सुमारे १,००० हून अधिक रुग्णांना जेवण पुरवले जाते.

या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष

रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या निकृष्ट दर्जाबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र, प्रशासनाने या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. रुग्णांच्या आरोग्याशी आणि जिवाशी थेट संबंधित असलेल्या अन्नाबाबत असा निष्काळजीपणा समोर आल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकरणावर महिंद्रकर यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधलाय.

प्रशासन गप्प का बसले

“सध्या राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबत धडक कारवाया सुरू आहेत. असे असताना ठाण्यातील सरकारी रुग्णालयात एवढा अक्षम्य प्रकार घडूनही अन्न व औषध प्रशासन गप्प का बसले आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच रुग्णालयातील स्वयंपाकघर, अन्न तयार करण्याची व साठवणुकीची प्रक्रिया अन्न सुरक्षा मानकांनुसार तपासण्याची मागणी केली.

मनसेची मागणी काय?

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. या प्रकरणी संबंधित जेवण पुरवठादार ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकून त्याच्यावर तसेच जबाबदार रुग्णालय अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईत पुन्हा बुरख्यावरून वाद पेटला; हॉस्पिटलमध्ये प्रवेशासाठी महिलेला ठेवली एक अट, कारण विचारताच सुरक्षा रक्षकाने…
  • ‘राज’ सिनेमातील भूत आठवतेय? 23 वर्षांनी कॅमेरासमोर येताच झटक्यात वाढले फॉलोअर्स, खचाखच भरला इनबॉक्स
  • महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
  • OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
  • तिलक वर्माच्या शतकाने मुंबईकर खेळाडूचे टेन्शन वाढवले, आता भारतीय संघातून कट होणार पत्ता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in