
बुध ग्रह २२ ऑगस्टला केतूच्या मघा नक्षत्रात प्रवेशले होते. आता २९ ऑगस्टला बुध पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करतील. या दरम्यान २८ ऑगस्टला रक्षाबंधनाचे पर्व साजरे केले जाईल. रक्षाबंधनाच्या पर्वापर्यंत राशींना आर्थिक लाभ होऊ शकतो. मेष, तुळ आणि धनु या ३ राशींना बुध केतू नक्षत्रात असल्याने लाभ होऊ शकतो. ज्योतिषांच्या मते, या लकी राशींना करिअरमध्ये प्रगती मिळेल. या लोकांच्या कमाईत वाढ होईल.
धनु राशीच्या लोकांच्या करिअरमधील अडथळे दूर होतील. या लोकांना कामात यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला लाभ होऊ शकतो. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल.
मेष राशीच्या लोकांना कामात यश मिळेल. या लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला रक्षाबंधनपर्यंत लाभ मिळेल.
ग्रहांच्या स्थितीनुसार, तुळ राशीच्या लोकांच्या कमाईत वाढ होऊ शकते. तुमच्या उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी वेळ चांगला राहील.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून केवळ माहितीसाठी आहे. tv9 मराठी या माहितीचे समर्थन करत नाही)




Leave a Reply