• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LSG vs PBKS : 6,6, कॅप्टन ऋषभ पंतचा एकहाती षटकार, मार्को जान्सेनची धुलाई, एका ओव्हरमध्ये किती धावा? पाहा व्हीडिओ

April 19, 2026 by admin Leave a Comment

पंजाब किंग्सने रविवारी 19 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. प्रियांश आर्य आणि कुपर कोनोली या दोघांनी केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबने घरच्या मैदानात लखनौ सुपर जायंट्ससमोर 250 पार मजल मारली. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 254 धावा केल्या. विजयी धावांचा पाठलाग करताना लखनौने सुपर सुरुवात केली. मिचेल मार्श आणि आयुष बडोनी या दोघांनी पावरप्लेच्या पहिल्या 6 षटकांत 61 धावा जोडल्या. आयुषच्या रुपात लखनौने पहिली विकेट गमावली. आयुषने 35 धावा केल्या. त्यानंतर कॅप्टन ऋषभ पंत मैदानात आला. पंतने पहिल्याच ओव्हरमध्ये कमाल केली. पंतने मार्को यान्सेनसारख्या उंचपुऱ्या गोलंदाजांसमोर एकहाती षटकार लगावले. पंतने या ओव्हरमध्ये एकूण 2 षटकार लगावले. पंतच्या या फटकेबाजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऋषभ पंतचा एकहाती सिक्स, मार्को जान्सेनची धुलाई

Vintage Rishabh Pant making it look completely effortless 🔥

🎥 Make sure you wait for that trademark one-handed maximum at the end! 🤌

Updates ▶ https://t.co/u5eUR1eqdA#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/UZobI2Qhxm

— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2026

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराणच्या नादाला लागून अमेरिकेचं भयंकर नुकसान! ड्रोनसह लढाऊ विमानांवर हल्ले, इराणच्या दाव्याने ट्रम्प हैराण
  • Mumbai | मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं कारण थक्क करणारं
  • ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ अमेरिकेसाठी का आहे मौत का कुआँ ? काय आहेत आव्हाने ?
  • IPL 2026 Points Table : पंजाब पुन्हा नंबर 1, केकेआरच्या विजयामुळे मुंबई दहाव्या स्थानी
  • GT vs MI Live Streaming : मुंबईसमोर गुजरातला सलग चौथ्या विजयापासून रोखण्याचं आव्हान, सामना किती वाजता?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in