• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ अमेरिकेसाठी का आहे मौत का कुआँ ? काय आहेत आव्हाने ?

April 19, 2026 by admin Leave a Comment


स्ट्रेट ऑफ होर्मुझ जगातला सर्वात महत्वाचा समुद्री मार्ग आहे. येथून रोज कोट्यवधी बॅरल तेल नेले जाते. या समुद्री मार्गावर इराणचा कब्जा आहे. कारण इराणची भौगोलिक रचनाच अशी आहे जी त्याला नैसर्गिक मदत करते. त्यामुळे अमेरिका आणि तिच्या सहकारी राष्ट्रांनाही ही सामुद्रीधुनी उघडणे हे आव्हानात्मक काम ठरणार आहे. कशी आहे ही होर्मुझ सामुद्रधुनी हे पाहूयात..

इराणने रशिया आणि युक्रेनच्या युद्धातून अनेक महत्वाचे धडे शिकलेले आहेत. त्याच आधारे इराण आपली रणनिती आखत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ इराणसाठी नैसर्गिक सुरक्षा कवचासारखे काम करते. इराणी दीर्घ किनारपट्टी आणि झिगझॅक टाईपची कोस्टलाईल, डोंगराळ प्रदेश, त्यातील भुयारे आणि गुहा यांचा मोठा फायदा इराण मिळत आहे. यात भुयारमध्ये इराण छोटी शस्रास्रे, मिसाईल आणि ड्रोन लपवून ठेवले आहेत.

उंच डोंगर आणि प्रतिकूल भौगोलिक रचना इराणला हा ‘किल झोन’ बनवण्यास मदत करत आहे.जेथे शत्रूंची जहाजे सहज टार्गेट केली जाऊ शकतात. तसेच इराणकडे अनेक छोटी-छोटी बेटे आहेत. ज्यांचा मिसाईल लाँच साईट रुपात वापर केला जाऊ शकतो. केश्म बेटावर इराणच्या सैन्याची मजबूत तैनाती आहे.

अमेरिकी सैन्य आणि नौदलाला जर स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा खोलायची असेल तर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण पाणी अनेक जागी कमी खोल आहे.ज्यामुळे मोठ्या युद्धनौका येथे सहज संचार शकत नाहीत. दुसरीकडे इराणकडून येणाऱ्या मिसाईल आणि ड्रोनचा सामना त्यांना करावा लागू शकतो. वाकडी तिकडी किनारपट्टी असल्याने आणि डोंगरात लपवलेल्या शस्रास्रांनी इराण सहज हल्ले करु शकतो आणि पुन्हा गायब होऊ शकतो. लांब असलेली किनारपट्टी इराण अनेक एंट्री आणि एक्झिट पॉईंट देते, त्यामुळे अमेरिकन जहाजांना त्रास देणे इराणला जमू शकते.

रशिया आणि युक्रेन युद्धात छोटे-छोटे ड्रोन , मिसाईल आणि एसिमेट्रीक युद्धाने मोठ्या ताकदीला देखील जेरीस आणू शकते. इराणने यातून धडा घेतला. त्यामुळे इराणने त्यांच्या किनारपट्टीवर या छोट्या शस्रांनी जाळे विणले आहे. छोटे ड्रोन देखील मोठ्या युद्धनौकांना भारी पडू शकतात याचा धडा युक्रेन युद्धाने इराणला मिळाला आहे.

होर्मुझच्या जवळ सौदी, बहारीन, कतार आणि युएईच्या महत्वाच्या अनेक तेल रिफायनरी आणि टर्मिनल आहेत. जर होर्मुझ येथे युद्ध पेटले तर इराण या देशांच्या रिफायनरींना टार्गेट करु शकतो. इराणची भौगोलिक स्थिती त्याला संरक्षणात्मक फायदा देते. ५६ किमी रुंद शिपिंग मार्गाला नियंत्रित करणे सोपे ठरणार नाही.कारण इराण सहजपणे बाहेर जाणाऱ्या जहाजांना ब्लॉक करु शकतो.

अमेरिकेकडे मर्यादित पर्याय का ?

अमेरिकन सैन्याला मोठा धोका आहे. म्हणून ते पर्यायी मार्ग शोधत आहेत. मात्र स्ट्रेट ऑफ होर्मुझ जगातला सर्वात व्यस्त तेल मार्ग आहे. यास बंद करणे वा खोलण्यास खूप वेळ, साहित्य आणि जिवीत आणि मनुष्यहानी होऊ शकते. इराणने युक्रेनकडून एसिमेट्रिक युद्ध, ड्रोन हल्ले आणि भुगोलाचा फायदा उठवण्याचा धडा शिकला आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुझ इराणसाठी एक नैसर्गिक किल्ला आहे. ज्याद्वारे शत्रूसाठी खूप मोठा धडा देता येऊ शकतो. अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांना या खोलायचे असेल तर मोठी किंमत चुकवावी लागू शकते. त्यामुळे इराण आत्मविश्वासाने स्वत:च्या संरक्षणासाठी सज्ज होत आहे. या स्थितीमुळे कळते की आधुनिक युद्धात केवळ मोठे सैन्य असून उपयोगाचे नाही. तर स्मार्ट भुगोल, स्वस्त शस्रे देखील निर्णायक भूमिका घेऊ शकतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold-Silver : सोने-चांदी सोडा या धातूचा बाजारात धाक, आता कमाईच कमाई, भडकणार किंमती?
  • इराणच्या नादाला लागून अमेरिकेचं भयंकर नुकसान! ड्रोनसह लढाऊ विमानांवर हल्ले, इराणच्या दाव्याने ट्रम्प हैराण
  • Mumbai | मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं कारण थक्क करणारं
  • ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ अमेरिकेसाठी का आहे मौत का कुआँ ? काय आहेत आव्हाने ?
  • IPL 2026 Points Table : पंजाब पुन्हा नंबर 1, केकेआरच्या विजयामुळे मुंबई दहाव्या स्थानी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in