• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai | मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं कारण थक्क करणारं

April 19, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) येथे झालेल्या एका कॉन्सर्टने ड्रग्स पार्टीचे स्वरूप घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू असताना मद्याबरोबरच ड्रग्सचेही मोठ्या प्रमाणात सेवन झाल्याचा आरोप होत आहे. तसेच पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या कॉन्सर्टमधील सुरक्षा रक्षकालाही अटक करण्यात आली आहे. प्रकरणातील आरोपी विनित गोरेला याने सुरक्षा रक्षकाला लाच देऊन विनापरवाना कॉन्सर्टला गेला असल्याचं समोर आलं आहे.

या घटनेत ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोन तरुण-तरुणींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोघांनी पार्टीत जाण्यापूर्वी एक-एक कॅप्सूल घेतली होती आणि नंतर आणखी एक कॅप्सूल घेतल्याने ओव्हरडोस झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, बचावलेल्या एका तरुणीला उलट्या झाल्याने तिचा जीव वाचला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर, सिद्धिविनायक मंदिरात लांबच लांब रांग
  • Siddhivinayak Temple | अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • Gold-Silver : सोने-चांदी सोडा या धातूचा बाजारात धाक, आता कमाईच कमाई, भडकणार किंमती?
  • इराणच्या नादाला लागून अमेरिकेचं भयंकर नुकसान! ड्रोनसह लढाऊ विमानांवर हल्ले, इराणच्या दाव्याने ट्रम्प हैराण
  • Mumbai | मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं कारण थक्क करणारं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in