• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणांना सरकारचं सरप्राईज, गौरी आगमनाच्यावेळी जमा होणार पैसे

September 1, 2026 by admin Leave a Comment


ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. जुलै महिन्याचे पैसे बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. परंतु ऑगस्ट महिन्याचे पैसे अजूनही महिलांना मिळालेले नाहीत, सप्टेंबर महिना सुरू झाला आहे, त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यावर कधी जमा होणार? याकडे सर्व लाभार्थी महिलांचे डोळे लागले आहेत. ऑगस्ट महिन्यांच्या पैशांबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार गणेशोत्सव काळात विशेष: गैरी आगमनाच्यावेळी महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा हाफ्ता जमा करण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या योजनेतील लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा हाफ्ता हा गौरी आगमनाच्या वेळी मिळू शकतो. ऐन सणासुदीला बँक पैसे जमा झाल्यामुळे सण आनंदात साजरा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र गैरी आगमनाच्या वेळी बँकेत पैसे जमा होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंर्गत ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये आहेत, अशा कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत या योजनेचा मोठा फायदा हा तत्कालीन महायुती सरकारला झाल्याचं देखील बोललं जात होतं. दरम्यान त्यानंतर ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सरकारने या योजनेसाठी केवायसी लागू करण्याचा निर्णय घेतला. केवायसीनंतर लाखो महिला या याजोनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, त्यांची नाव या योजनेतून वगळण्यात आली आहेत. काही ठिकाणी तर पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
  • आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in