• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक

July 29, 2026 by admin Leave a Comment


मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी नव्या वाहनांच्या खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला असून, स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी पुढे आली आहे. स्कॉर्पिओ एन प्रवासासाठी पुरेशी सोयीची नसल्याची तक्रार करण्यात आल्याने हा प्रस्ताव पुढे सरकला असल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिकेतील सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर तसेच तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात पालिकेने संबंधित पदाधिकाऱ्यांसाठी स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी केली होती.

महापालिकेच्या निवडणुकीनंतर नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिकांची वर्दळ वाढल्याने विविध पदाधिकाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. महापौर ऋतु तावडे यांच्या सेवेसाठी सुमारे 30 ते 35 लाख रुपयांची इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड गाडी देण्यात आली असून, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ वाहने देण्यात आली आहेत. मात्र, स्कॉर्पिओ एन वाहन प्रवासासाठी सोयीचे नसल्याची तक्रार सभागृह नेते गणेश खणकर यांनी केल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, या प्रस्तावावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच मोठ्या खर्चातून गाड्या खरेदी करण्यात आल्या असताना पुन्हा नव्या वाहनांची मागणी करणे योग्य नाही. स्कॉर्पिओ गाड्यांबाबत नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच, महापालिकेच्या निधीचा वापर आवश्यक आणि जनहिताच्या कामांसाठी व्हावा, पदाधिकाऱ्यांच्या सुविधांवर अनावश्यक खर्च होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. याशिवाय, महापौरांच्या खासगी सचिवांच्या मानधनासह इतर खर्चांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर टीका केली. दरम्यान, नव्या वाहनांच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेतला जाणार असून, या विषयावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in