• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Jeetendra : जितेंद्रचा हेमामालिनी सोबतचा हा चित्रपट रिलीजनंतर लगेच बॅन झालेला,पुन्हा प्रदर्शित होताच प्रेक्षक तुटून पडलेले

June 19, 2026 by admin Leave a Comment


चित्रपटांच्या इतिहासात अशाही काही फिल्मस आहेत, ज्यांच्या मेकिंगपेक्षा वादांमुळे ते चित्रपट जास्त चर्चेत राहिले. अनेकदा वाद इतके वाढतात की, चित्रपट रिलीज करणं कठीण होऊन बसतं. पण अशाही काही फिल्मस आहेत, ज्यांनी अडथळ्यांवर मात करुन यश कमावलं. 1981 साली आलेल्या जितेंद्र यांच्या चित्रपटासोबतही असचं काहीस झालं होतं. आयएमडीबीनुसार, रिलीज नंतर तात्काळ या चित्रपटावर बंदी घालण्यात आलेली. निर्मात्याला कोर्टात जावं लागलेलं. फिल्ममध्ये बदल करावे लागले. पण पुन्हा हा चित्रपट रिलीज झाला, तेव्हा या फिल्मने कमाल केली. जितेंद्रचा हा चित्रपट होता ‘मेरी आवाज सुनो’.

1981 साली रिलीज झालेल्या ‘मेरी आवाज सुनो’ चित्रपटाचं दिग्दर्शन एस वी राजेंद्र सिंह यांनी केलं होतं. चित्रपटात जितेंद्र, हेमा मालिनी आणि परवीन बाबी मुख्य भूमिकेत होते. शक्ती कपूर, रंजीत आणि कादर खान यांनी खलनायकाचा रोल साकारलेला. चित्रपटात मंत्री, पोलीस अधिकारी आणि मोठ्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार दाखवलेला. रिलीज नंतर या चित्रपटावर आक्षेप नोंदवण्यात आला व चित्रपट रोखण्यात आला. विषय कोर्टापर्यंत पोहोचला. काही बदल केल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी मिळाली.

‘हिंदुस्तान’शब्द वापरलेला, तो बदलून ‘मुंडुस्तान’ केला

चित्रपटात दाखवलेलं काल्पनिक देश किंवा जागेचं नाव सुद्धा बदलावं लागलेलं. चित्रपटात जिथे ‘हिंदुस्तान’शब्द वापरलेला, तो बदलून ‘मुंडुस्तान’ करावा लागला. त्यानंतर पुन्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला. खास बाब ही आहे की, वादामुळे चित्रपटाचं नुकसान होण्याऐवजी उलटा फायदा झाला. लोकांच्या मनात कुतूहल वाढलं. अखेर चित्रपटात या असं काय दाखवलेलं, ज्यामुळे इतका वाद झाला, म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणात थिएटरला आले.

..म्हणून लोक थिएटर बाहेर पडल्यानंतरही या चित्रपटाबद्दल चर्चा करायचे

‘मेरी आवाज सुनो’ ची ताकद चित्रपटाचा शेवटचा भाग आहे. चित्रपटात जितेंद्र सर्व गुन्हेगारांना संपवल्यानंतर स्वत: न्यायाधीशांसमोर जाऊन आत्मसमर्पण करतो. त्यानंतर पडद्यामागून एक प्रश्न विचारला जातो, देशासाठी सर्व काही गमावणाऱ्या या माणसाला न्याय मिळाला पाहिजे का?. विशेष म्हणजे चित्रपट या प्रश्नाचं उत्तर देत नाही. निर्णय प्रेक्षकांवर सोडला जातो. हेच कारण होतं, लोक थिएटर बाहेर पडल्यानंतरही या चित्रपटाबद्दल चर्चा करायचे.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने किती कमाई केली?

चित्रपटात हेमा मालिनी आणि परवीन बाबीचा सुद्धा महत्वाचा रोल होता. जवळपास 3 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या ‘मेरी आवाज सुनो’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 6.5 कोटी रुपयांची कमाई केलेली. हा चित्रपट हिट ठरलेला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : फक्त या सवयी बदला; नशीबही बदलेल, तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही
  • जिन्याखाली देवघर बांधणे का मानले जाते अशुभ? वास्तुशास्त्रातील महत्त्वाची सूचना
  • FIFA World Cup: मुस्लिम खेळाडूंना का दिली जात आहे वेगळी ट्रॉफी? पुरस्कारासाठी केला असा बदल
  • Vastu Shastra : झोपेतून उठताच कधीही पाहून नका या पाच वस्तू; संपूर्ण दिवस जाईल खराब, घरात येते नकारात्मक ऊर्जा
  • एअर होस्टेस या एका गोष्टीशिवाय राहुच शकत नाहीत, कॉकपीटमध्येच.., माजी एअर होस्टेसने सांगितलं विमानातील डार्क सीक्रेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in